नागपूर (Nagpur) : पूर्व नागपुरातील लकडगंज पोलिस स्टेशनला स्मार्ट पोलिस स्टेशन अवॉर्ड जाहिर करण्यात आला. बिरला समुहाचे घनश्यामदास बिरलाद्वारा स्थापित देशातील सर्वात मोठे व्यापारी संगठन फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड अँड इंडस्ट्री (FICCI) द्वारा स्मार्ट पोलिसिंग ऍवॉर्ड २०२१ जाहीर करण्यात आले.
लकडगंज पोलिस स्टेशन परिसरात जवळपास पाच एकर जागा मागील अनेक वर्षापासून रिकामी होती. या ठिकाणी पूर्वी पोलीस क्वार्टर होते. ते जीर्ण झाले होते. २०१४ ला राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले व गृहमंत्रालयसुद्धा त्याच्याकडे होते. या लकडगंज पोलिस ठाण्याची दखल त्यांनी घेतली. या पाच एकर जागेवर स्मार्ट पोलिस निवासी संकुल सह स्मार्ट पोलीस स्टेशनचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या प्रोजेक्टकरिता नागपूर सुधार प्रन्यासला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. नासुप्रद्वारेच हा प्रस्ताव तयार करण्यात आला. आज हा प्रोजेक्ट पूर्णत्वास होण्याचा मार्गावर आहे.
लकडगंज पोलिस ठाण्याचा स्मार्ट पुरस्कार प्राप्त झाला असला तरी येथील पोलिसांच्या संकुलाचे काम अद्याप अपूर्णच आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात याचे काम जवळपास थांबलेच होते. त्यामुळे पूर्व नागपूरचे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. आता राज्यात पुन्हा भाजप सत्तेत आल्याने संकुलाच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे.