book

 

tendernama

विदर्भ

Nagpur ZP : पदाधिकाऱ्यांचे एक कोटींच्या पुस्तके खरेदीसाठी लॉबिंग

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : आपली मुले हुश्शार व्हावीत आणि त्यांच्या ज्ञानात भर पडावी, भविष्यातील स्पर्धा परिक्षेत त्यांचा टिकाव लागावा याकरिता नागपूर जिल्हा परिषदेच्या (Nagpur Zilha Parishad) शैक्षणिक विभागाच्यावतीने एक कोटी रुपयांची अवांतर पुस्तके (Book) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शिकून आधीच हुशार झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पुस्तके खरेदीसाठी पुरवठादारासोबत लॉबिंग सुरू केले आहे. तर, दुसरीकडे अधिकाऱ्यांना टेंडर (Tender) काढायचे आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे.

जिल्हा नियोजन समितीमार्फत याकरिता निधी मंजूर करण्यात आला आहे. एक कोटींचा निधी असल्याने या व्यवहारावर पदाधिकाऱ्यांची नजर आहे. पुस्तक पुरवठ्याचे काम मिळण्यासाठी एक पुरवठादाराने जिल्हा परिषदेत फेऱ्या मारणे सुरू केले आहे. त्याने एका पदाधिकाऱ्यासोबत संपर्कसुद्धा साधल्याचे कळते. हाच पुरवठादार एका मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत दाखल झाला आहे. शिक्षण समितीच्या बैठकीत अप्रत्यपक्षणे थेट खरेदीसाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे.

शिक्षण विभागाला मात्र हे रुचले नाही. त्यांना याकरिता टेंडर काढायचे आहे. चांगले साहित्य खरेदी करायचे आहे. संबंधित पुरवठादाराकडे उपलब्ध असलेली पुस्तके विद्यार्थ्यांच्या फारशी उपयोग नसल्याचे शिक्षण विभागाचा दावा आहे. तसेच ३० ते ३५ प्रकारचीच पुस्तके पुरवठादाराकडे आहे. त्यामुळे टेंडरच्या माध्यमातून अधिकाधिक पुरवठादार येतील. त्यातून योग्य पुरवठादाचा निवड करणे चांगले राहील असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पुस्तक खरेदीवरून पदाधिकारी विरुद्ध अधिकारी असा वाद सुरू झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी योगेश कुंभोजकर टेंडरच्या बाजूने आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीची आचार संहिता नुकतीच संपली आहे. त्यामुळे पुस्तक खरेदीच्या घडामोडींना वेग येणार आहे. तत्पूर्वी झालेल्या वाटाघाटीमुळे अवांतर पुस्तके खरेदीची चांगलीच चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात रंगली आहे. एक कोटीची खरेदी वादात अडकू नये याकरिता काही तज्ज्ञांची मदत घेतल्या जात आहे. एकगठ्‍ठा एवढ्या रकमेची पुस्तके खरेदी करण्याऐवजी ती टप्प्याटप्याने खरेदी करावी, त्यामुळे नियमानुसार टेंडर काढण्याचा प्रश्न उद्‍भवणार नाही, यासाठीसुद्धा खटाटोप सुरू आहे.

टेंडरनामाच्या फेसबुक पेजला लाईक करा - https://www.facebook.com/tendernama

टेंडरनामाच्या ट्विटर पेजला फॉलो करा - https://twitter.com/tendernama

टेंडरनामाच्या इन्टाग्राम पेजला फॉलो करा - https://www.instagram.com/tendernama