Vande Metro Tendernama
विदर्भ

Nagpur : रेल्वेकडून Good News! आता वंदे भारत प्रमाणेच वंदे मेट्रोही धावणार

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : आता वंदे भारत ट्रेन सारखीच वंदे मेट्रो चालवण्याची योजना बनवली जात आहे. याच वर्षी चेन्नईच्या आयसीएफद्वारे वंदे मेट्रोची निर्मिती केली जाणार आहे. नागपूर ते गोंदिया, काटोल, सावनेर, उमरेड अशी वंदे मेट्रो चालवण्याची योजना आहे. वंदे भारत ट्रेनचे डबे आयसीएफ चेन्नई (इंटिग्रल कोच फॅक्टरी) येथे तयार केले जात आहेत. सध्या 25 वंदे भारत गाड्या प्रगतीपथावर आहेत ज्यात अधिक प्रगत सुरक्षा आणि तांत्रिक सुधारणा  केली आहे. (Vande Bharat Express - Vande Bharat Metro)

गेल्या वर्षीपासून, आयसीएफ चेन्नई रेल्वे बोर्डाने दिलेल्या लक्ष्याच्या दिशेने काम करत आहे. वंदे भारत ट्रेनच्या नवीन आवृत्तीचे 12 डबे आणि 2261 असे एकूण 2702 डबे तयार करण्यात आले आहेत. यात एलएचबी कोचचा समावेश आहे. येत्या काही वर्षांत वंदे भारत एक्सप्रेस नवीन प्रकारच्या ट्रेन्ससह सुमारे 30 प्रकारांमध्ये 3241 कोच तयार करण्याची योजना आहे.

सोबतच आयसीएफ चालू वर्षात वंदे मेट्रो नावाने वंदे भारत ट्रेनची दुसरी आवृत्ती सुरू करणार आहे. ही ट्रेन इंटरसिटी म्हणून कमी अंतराच्या प्रवाशांच्या प्रवासाची पूर्तता करेल. प्रवाशांना सहज चढण्यासाठी आणि डी-बोर्डिंगसाठी दुहेरी पानांचे दरवाजे असतील. नागपुरातून कमी अंतराची मेट्रो चालवण्याची घोषणा अनेकवेळा झाली असल्याने ही रेल्वे नागपूरहून जोडली जाऊ शकते. अशा स्थितीत वंदे मेट्रो धावण्याची योजना असून, त्यानंतर ती नागपूरसह विविध ठिकाणी धावणार आहे. मार्च 2024 पर्यंत वंदे मेट्रो योजना सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.