नागपूर (Nagpur) : ‘चलाजाणूया नदीला’ या अभियानाच्या माध्यमातून नदीचा प्रवाह पूर्ववत करुन नदी पात्रातील अतिक्रमण, गाळ काढणे तसेच नदीस्वच्छतेसाठी लोक सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत असून विभागातील 13 नद्यांचा अमृत वाहिनी म्हणून विकास करण्यात येणार आहे. नदी संवाद यात्रेच्या माध्यमातून विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले.
विभागीयआयुक्त कार्यालयात ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाचे राज्यस्तरीय सदस्य जलपुरुष राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना आयुक्त बोलत होत्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा उपक्रमराबविण्यात येत आहे. चला जाणुया नदीला या अभियानांतर्गत नदी साक्षरता वाढविण्यासोबतच नागरिकांच्या सहकार्याने नदीचा सर्वंकष अभ्यास करुन आराखडा तयार करण्यात येत आहे. या अंतर्गतविभागातील 13 नद्यांचा समावेष अमृत वाहिनी बनविण्यासाठी करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांनी नोडल अधिकारी तसेच नदी प्रहरी यांच्या माध्यमातून नदी प्रवाहपूर्ववत करण्यासाठी उपाययोजना सूचवायच्या आहेत. या उपाययोजनांच्या माध्यमातूनप्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी व पावासाळ्यापूर्वी या अभियांनातंर्गत निवडण्यातआलेली कामे पूर्ण करावी, अशा सूचना यावेळी विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या.
अडथळा ठरणारे अतिक्रमन काढावे : राजेंद्र सिंह
नदीला अमृत वाहिनी तयार करण्याच्या कामाला विभागात चांगली सुरुवात झाली असून वर्धा,गोंदिया, भंडारा, व गडचिरोली या जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्तकरतांना राजेंद्र सिंह म्हणाले की, उगमस्थान ते संगमापर्यंत या नद्यांच्यापात्रांचा महसूल विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार आराखडा तयार करणे आवश्यक आहे. नदीचेपाणी वाहून जाण्यासाठी अडथळा ठरणारे अतिक्रमन काढावी तसेच नदीप्रदुषण होणार नाहीयाची खबरदारी घ्यावी. अभियानातंर्गत नदीचा आराखडा तयार केल्यानंतर नोडल अधिकारी वनदीप्रहरी यांच्या नियमित बैठकी जिल्हाधिकारी यांनी घेऊन प्रगतीचा आढावाघेण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. संपूर्णनदीचा विकास करतांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून खोलीकरण, रुंदीकरण, गावातील सांडपणी व घनकचरा व्यवस्थापन आदी बाबींवर उपाययोजना कराव्यात तसेचपर्यावरणाच्या दृष्टिने नदी स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे. नद्यांच्या पात्रात नवीन बांधकाम होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना राजेंद्र सिंह यांनी बैठकीत केल्या.
या नद्यांचा समावेश :
‘चलाजाणुया नदीला’ या अभियानाअंतर्गत जिल्हानिहाय नदी संवाद यात्रेचे आयोजन करण्यातआले असून त्यानुसार आराखड्याला अंतिम रुप देण्यात येत आहे. विभागतील या उपक्रमात 13 नद्यांचा समावेश असून नागपूर जिल्ह्यातील नाग नदी 56 किलोमीटर, साधुखोरा (आंब) नदी 25.5 किमी, गोंदिया जिल्ह्यातील चूलबंद नदी 28 किमी, चंद्रपूर जिल्ह्यातील उमानदी 130 किमी, इरई नदी 104 किमी, गडचिरोली जिल्ह्यातील खोब्रागडी नदी 81 किमी, कठाणी नदी 70 किमी, पोहरा/ पोपखोडी नदी 54 किमी, वर्धा जिल्ह्यातील धाम नदी 86किमी, वेना नदी 86 किमी, यशोधा नदी 445 किमी तर भंडारा जिल्ह्यातील चूलबंद ववैनगंगा नदीचा समावेश आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्यामुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा (नागपूर), विवेक जॉनसन (चंद्रपूर),एस.एम.कुर्तकोटी (भंडारा), ‘चला जाणूया नदीला’ अभियानाचे राज्य समन्वयक रमाकांत कुळकर्णी, जल बिरादरीचेअध्यक्ष डॉ. नरेंद्र चुघ, डॉ. प्रविण महाजन यांचेसह विभागातील सर्व जिल्हाधिकार,मुख्य कार्यकारी अधिकारी, वन अधिकारी, नोडल अधिकारी तसेच नदी प्रहरी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.