Sports Complex Tendernama
विदर्भ

Nagpur : सक्करदरात होणार छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सक्करदरा येथील छत्रपती संभाजी महाराज सभागृह व क्रीडा संकुलाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

यामध्ये 6 मजली इमारत बांधण्यात येणार आहे. तळघर मध्ये पार्किंग, तळमजल्यावर स्विमिंग पूल व दुकान खोल्या, पहिल्या मजल्यावर दुकाने व उपाहारगृहे, दुसऱ्या मजल्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित संग्रहालय, तिसऱ्या मजल्यावर वातानुकूलित मल्टिपर्पज हॉल, चौथ्या मजल्यावर क्रीडा संकुल आणि पाचव्या मजल्यावर स्पोर्ट कॉम्प्लेक्स चा निर्माण केला जाईल. ज्यामध्ये इनडोर गेम असतील. सहाव्या मजल्यावर ओपन टेरेस रेस्टॉरंट असेल. एनआयटी विश्वस्त व आमदार मोहन मते यांनी एनआयटीच्या विस्तारित कार्यालयाच्या मंजूर जागेवर छत्रपती संभाजी महाराज सभागृह व क्रीडा संकुल उभारणीसाठी ठराव दिला होता, ज्याला मंजुरी देण्यात आली आहे.

शिवसृष्टी प्रकल्प : 

महाराष्ट्र गौरव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी प्रकल्प पुण्यात बांधण्यात आला आहे. त्यानुसारच नागपूर शहरातील महाराजांच्या जीवनशैलीची माहिती नवीन पिढीला व्हावी यासाठी मौजा लेंद्रा, खसरा क्रमांक 217/3 व 217/1 येथे 7 एकर जागेवर शिवसृष्टी प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला सभेत मान्यता देण्यात आली. महापालिकेत नवनियुक्त प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांना एन आयटीच्या विश्वास्ताची मंजूरी देण्यात आली आहे. आयटीचे अध्यक्ष मनोज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विश्वासू आमदार मोहन मते, संदीप इटकेलवार इत्यादी उपस्थित होते.