Sanjay Kute Tendernama
विदर्भ

जळगाव जामोदमध्ये कंत्राटदारांची धावपळ नेमकी कशासाठी?

टेंडरनामा ब्युरो

संग्रामपूर (Sangrampur) : जळगाव जामोदमध्ये (Jalgoan Jamod) रस्त्यांचे जाळे आणि उड्डाण पुलांच्या निर्मितीसाठी आमदार संजय कुटे (Sanjay Kute) यांनी ३३ कोटी रुपयांचा निधी आपल्या मतदारसंघासाठी आणला आहे. लवकरच टेंडर बोलावून कामाला सुरवात केली जाणार असल्याने ही कामे मिळाविण्यासाठी कंत्राटदारांनीही प्रयत्न सुरू केले आहेत.

राज्‍याचे अर्थसंकल्पी अधिवेशन नुकतेच पार पडले. यात संजय कुटे यांनी आपल्या मतदारसंघासाठी मोठे निधी खेचून आणला. त्यामुळे जळगाव जामोदच्या विकासाला बुस्टर डोस मिळणार आहे. या निधीतून आदिवासी बहुल भागात रस्त्याचे जाळे तयार करण्याचा मानस असल्याचे आमदारांनी सांगितले. लहान पुलाचे बांधकाम करण्याकरिता २७३ लाख, संरक्षक भिंत व रस्त्यासह लहान पुलाचे बांधकाम करण्याकरिता १९० लाख, लहान पुलाचे पोचमार्गासह बांधकाम करण्यासाठी २८५ लाख, रस्ता व संरक्षक भिंतीसह लहान पुलाचे बांधकाम करणे करीता १९० लाख, लहान पुलांच्या बांधकामाकरिता ३०० लाख जळगाव जामोद येथील न्यायालयीन इमारतीच्या पहिल्या मजल्याचे उर्वरित बांधकाम व इतर कामासाठी ३२८ लाख मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती व बांधकामासाठी १५ कोटी असे नियोजन या निधीतून केले जाणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील जगळगाव जामोद महत्त्वाचे शहर आहे. या शहराला ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. मुघलांच्या काळापासून हे शहर अस्तित्वात आहेत. आजही इतिहासकालीन वास्तू या शहरात उभ्या आहेत. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेले हे शहर इतरांच्या तुलनेत विकास प्रक्रियेपासून थोडे दुर्लक्षिात राहिले आहे.