Nagpur Metro Bridge Tendernama
विदर्भ

Metro स्थानकाच्या छतावर बसून भोजन करायचेय, मग नागपुरला जा! कारण...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nahgpur) : महामेट्रो (Mahametro) नागपूर अंतर्गत नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या (Nagpur Metro Railway Project) सर्वत्र मेट्रो सेवा सुरू असून, मोठ्या प्रमाणात नागरिक या सेवेचा उपयोग करीत आहे. यामध्ये आणखी भर घालत नागपूर मेट्रो स्टेशनच्या छतावर उपलब्ध असलेल्या जागेवर ओपन एअर रेस्टॉरंट, कॅफे, भोजनालय सुरू करण्यासाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (Tender) प्रसारित करण्यात आल्या आहेत.

मेट्रो प्रवासाव्यतिरिक्त व्यावासायिक उपक्रमासाठी देखील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद महामेट्रोला मिळत आहे. अनेक मेट्रो स्थानकांवर व्यावासायिक दुकाने, शैक्षणिक वर्ग, सिनेमा हॉल देखील सुरू झालेले आहेत. महामेट्रोतर्फे नॉन फेयर बॉक्स रेव्हेन्यूच्या माध्यमातून अनेक उपाय योजना केल्या आहेत ज्याला व्यावसायिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.    

नागपूर मेट्रो सोबत व्यवसायाच्या सुवर्ण संधीसाठी महामेट्रोच्या वेबसाईट वर देखील ही टेंडर प्रकाशित करण्यात आलेली आहेत. मेट्रो स्थानकांवर व्यावासायिक उपक्रमासाठी माहिती करिता नागपूर मेट्रोच्या प्रॉपर्टी डेव्हलपमेंट विभागाशी संबंध साधावा, असे आवाहन महामेट्रो करत आहे. ओपन एअर रेस्टॉरंट/कॅफे टेंडरचा कालावधी 24 मे 2023 ते 23 जून 2023 पर्यंत आहे. 

उपलब्ध मेट्रो स्थानके... 

एयरपोर्ट मेट्रो स्टेशन (पश्चिम बाजू), जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशन (पूर्व बाजू), जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशन (पश्चिम बाजू), शंकर नगर मेट्रो स्टेशन (दक्षिण बाजू), बंसी नगर मेट्रो स्टेशन (उत्तर बाजू), बंसी नगर मेट्रो स्टेशन (दक्षिण बाजू) या स्टेशन वरच्या जागेत ओपन एयर रेस्टॉरंट सुरू करता येणार आहे.

नागपूर मेट्रोची प्रवासी वाहूतक सेवा सकाळी 6 ते रात्री 10 वाजता पर्यंत दर 15 मिनिटांनी उपलब्ध आहे.