Irrigation Tendernama
विदर्भ

Gondia : 30 वर्षानंतर 'हे' सिंचन प्रकल्प होणार पूर्ण; 282 हेक्टर शेतीला फायदा

टेंडरनामा ब्युरो

गोंदिया (Gondia) : सालेकसा तालुक्यातील पांढरवाणी उपसा सिंचन प्रकल्प 30 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पूर्ण होण्याची आशा बळावली आहे. सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यावर पांढरवाणी परिसरातील 282 हेक्टर शेती सुजलाम् सुफलाम् होणार आहे. याचा लाभ 243 अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षातून दोनदा धान पिकांसह इतर पिके घेऊन आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी संधी मिळेल.

1992-93 मध्ये सालेकसा तालुक्याच्या पांढरवाणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वरथेंबी पावसावर अवलंबित शेतीला सिंचनासाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून कालीसराड धरणावरील उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या उपसा सिंचन योजनेसाठी 74 लाख 34 हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. या योजनेच्या कामाला बराच कालावधी लागल्याने ही योजना रखडली होती. उशीजवळ पाणी असूनही शेतकऱ्यांना लाभ घेता येत नाही, ही शोकांतिका लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीवरून बंद पडलेले प्रकल्प सुरू करण्यात आले.

गेल्या 2 ते 3 वर्षापासून या उपसा सिंचन योजनेच्या कामाला पुन्हा गती मिळाली. या उपसा सिंचनाच्या कामाला बाघ पाटबंधारे विभागाकडून चालना मिळाल्यानंतर सद्यस्थितीत उपसा सिंचनासाठी 7.00 एचपी क्षमतेच्या दोन मोटर बसविण्यात आल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार 31 आउटलेटचे काम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत 5 आउटलेट सुरू करण्यात आले असून, उर्वरित आउटलेट सुरू करण्यासाठी प्रयल सुरू आहेत.

दोन कोटी 44 लाख मंजूर

पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन कोटी 44 लाख 67 हजार रुपये किमतीचे सुधारित अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. या योजनेसाठी 4 हेक्टर 56 दशांश खाजगी जमीन, 0.56 हेक्टर महसूल विभागाची जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे. 0.36 हेक्टर वनजमीन हस्तांतरित करण्याची आवश्यकता आहे. या उपसा सिंचन योजनेंतर्गत एकूण 243 शेतकऱ्यांच्या पांढरवाणी ग्रामपंचायतींतर्गत सुमारे 282 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचे पाणी देण्याची योजना आहे.

31 आउटलेटचे काम पूर्ण झाले

गेल्या 2 ते 3 वर्षापासून या उपसा सिंचन योजनेच्या कामाला पुन्हा गती मिळाली. या उपसा सिंचनाच्या कामाला बाघ पाटबंधारे विभागाकडून चालना मिळाल्यानंतर सद्यस्थितीत उपसा सिंचनासाठी 7.00 एचपी क्षमतेच्या दोन मोटर बसविण्यात आल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार 31 आउटलेटचे काम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत 5 आउटलेट सुरू करण्यात आले असून, उर्वरित आउटलेट सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उपसा सिंचन योजना, हा प्रकल्प आम्हा सर्व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतो. ये परंतु माझी शेती या प्रकल्पांतर्गत बनवलेल्या साच्यापासून 100 मीटर अंतरावर आहे. शेतात एक आउटलेट आहे; परंतु माझ्यापर्यंत पाणी पोहोचत नाही. प्रकल्प पूर्ण होण्याची वाट पाहत आहे, ज्याचा माझ्या सर्व शेतकरी बांधवांना फायदा होण्याची माहिती स्थानिक शेतकऱ्याने दिली.