Nagpur ZP Tendernama
विदर्भ

Nagpur : झेडपी अंतर्गत अंगणवाडी श्रेणीवर्धन घोटाळ्याची होणार चौकशी?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत केंद्र सरकार च्या अंगनवाडी श्रेणीवर्धन योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. भाजप च्या वरिष्ठ नेत्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय मार्फत विशेष समिती आणि भ्रष्टाचार विरोधी ब्यूरो (एसीबी) ला झालेल्या भ्रष्टाचाराची शहानिशा करण्याची मागणी केली आहे. 

श्रेणीवर्धन योजनेअंतर्गत नागपूर जिल्हा परिषदेला फेब्रूवारी-2024 मध्ये एक कोटी सहा लक्ष रुपये निधि अंगनवाडीला साहित्य खरीदी साठी मिळाली होता. महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूर ने दोन-दोन लाख रुपये निधि प्रकल्प अधिकारी, महिला व बालविकास च्या अकाउंट मध्ये ट्रांसफर केले व नंतर निधी परतही घेतले. हे संपूर्ण काम टेंडर प्रक्रिया नावापूर्ती दाखवून एकच ठेकेदाराला देण्यात आले. विशेष म्हणजे अंगनवाडीत साहित्य खरीदी केले नाही आणि पूर्ण निधि अकाउंट मधून काढण्यात आला. या शिष्टमंडळाने या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोबतच तालुक्यात साहित्य पुरवणाऱ्या संस्थांचे नावे देखील सांगितले.

नागपुर जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष सुधाकर कोहले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ ने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट केली. आणि झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी निवेदन दिले.  या शिष्टमंडळ ने दावा केला आहे या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. संबंधित विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, महिला बालविकास अधिकारी या प्रकरणात पूर्णपणे सहभागी आहे. जिल्हा परिषद च्या सर्व अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी लाच घेऊन यात भ्रष्टाचार केला आहे. जनतेने कांग्रेस वर विश्वास ठेऊन को जिल्हा परिषदेची सत्ता त्यांच्या हाती दिली होती थी. मात्र कांग्रेस चे पदाधिकारी भ्रष्टाचार करीत आहे. या प्रकरणाची तपासणी केली असता, आणखी भ्रष्टाचाराचे प्रकरण देखील समोर येतील.

 तालुक्यातील या संस्थांना मिळाला निधी : 

सावनेर श्री बुक डिपो एंड जनरल स्टोअर्स, यवतमाळ  8 लक्ष, भिवापुर शांभवी एजुकेशन एड्स, नागपूर 6 लक्ष, काटोल  श्री बुक डेपो एंड जनरल स्टोअर्स, यवतमाळ 8 लक्ष, पारशिवनी श्री बुक डेपो एंड जनरल स्टोअर्स, यवतमाळ 8 लक्ष, काटोल श्री बुक डेपो एंड जनरल स्टोअर्स, यवतमाळ 10 लक्ष, पारशिवनी श्री बुक डेपो एंड जनरल स्टोअर्स, यवतमाळ 12 लक्ष, नागपुर श्री बुक डेपो एंड जनरल स्टोअर्स, यवतमाळ 6 लक्ष, मौदा  शांभवी एजुकेशन एड्स, नागपूर 8 लक्ष, उमरेड शांभवी एजुकेशन एड्स, नागपूर 8 लक्ष, कलमेश्वर श्री बुक डेपो एंड जनरल स्टोअर्स, यवतमाळ  8 लक्ष, कामठी संजीवनी उद्योग, नागपूर 8 लक्ष, रामटेक शांभवी एजुकेशन एड्स, नागपूर 6 लक्ष, कुही शांभवी एजुकेशन एड्स, नागपूर 6 लक्ष, हिंगणा संजीवनी उद्योग, नागपूर 6 लाख, नरखेड़ श्री बुक डेपो एंड जनरल स्टोअर्स, यवतमाळ 6 लक्ष निधी मिळाला आहे.

झाली पाहिजे चौकशी : 

एक कोटी सहा लक्ष रुपये ची साहित्य खरीदी साठी प्रशासनिक व तांत्रिक मंजूरी घेण्यात आली नाही. साहित्य खरीदी प्रकरणात सभागृहाची मंजूरी घेण्यात आली नाही. पंचायत समिति स्तरावर साहित्य खरीदीसाठी पंचायत समिति ची अनुमति घेतली गेली नाही. प्रकल्प अधिकाऱ्यांनी सीईओ ला माहिती न देता रक्कम खर्च केली. अंगनवाडित किती साहित्य उपलब्ध आहे याची माहिती न घेता साहित्य दिले गेले. जिल्हा व पंचायत स्तरावर आवक-जावक रजिस्टर मध्ये कोणतिच नोंदणी नाही. ठेकेदारांनी दिलेल्या बिलावर दिनांक नाही. 

या प्रकरणात उपमुख्यमंत्री यांनी दिले चौकशीचे निर्देश : 

या प्रकारणाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत विभागीय आयुक्त व मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर सौम्या शर्मा को गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. माहिती अनुसार महिला व बालकल्याण विकास विभाग चे 13 प्रकल्प अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. तर जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकोडे आणि त्यांचे पति विष्णु कोकोडे यांची सुद्धा या प्रकरणात विचारपुस होऊ शकते.  हैं। तर महिला व बालकल्याणविकास विभागाची सभापति अवंतिका लेकुरवाले यांना या प्रकरण संबंधित विचारपुस केली असता त्यांनी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाही.