Jam Project Tendernama
विदर्भ

Nagpur : जाम प्रकल्पाच्या कालवा विकासासाठी मिळाले 92 कोटी

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : काटोल तालुक्यातील सर्वात मोठा असलेला जाम प्रकल्पाचे पाणी हे शेवटच्या टोकापर्यत जावे यासाठी कालव्याची दुरुस्ती करणे आवश्यक होते. यामुळे या कालव्याचा विकास व्हावा यासाठी 92.56 कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. आता याला मंजुरी मिळाली असुन कामाची सुरुवात करण्यासाठी  निधीचा पहिला हप्ता सुध्दा देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जि. प. सदस्य सलील देशमुख यांनी दिली. 

जाम प्रकल्पातुन काटोलसह नरखेड तालुक्यात सुध्दा शेतीसाठी पाणी देण्यात येते. शिवाय काटोल, कोंढाळी या शहराच्या पाणी पुरवठासह काटोल एमआयडीसीला सुध्दा येथुन पाणी पुरवठा होतो. एकप्रकारे काटोल व नरखेड तालुक्यासाठी वरदान ठरलेलला हा प्रकल्प आहे. कालव्याच्या शेवटचा टोक असलेल्या मिर्झापूर पर्यंत पाणी पोहचण्यासाठी अनेक अचडणीत येत होत्या. यासाठी सुरुवातीपासुन कालव्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता होती.

सातत्यपुर्व पाठपुरावा करुन अधिकाऱ्यांना भेटून 92.56 कोटीचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे सलील देशमुख यांनी सांगीतले. हा प्रस्ताव तयार करुन तो मुंबई येथील मंत्रालयात मंजुरीसाठी पाठविण्यात आला. मुंबई येथील अधिकाऱ्यांकडे यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला. 14 मार्च 2024 ला सादर करण्यात आलेल्या 92.56 कोटीच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. परंतु निधीची तरतुद करण्यात आली नाही. यासाठी सुध्दा आपण सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन सादर करण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पातुन यासाठी निधी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली आहे. या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता देखील वाढवली जाणार आहे. त्यामुळे अनेक गावांना बाराही महीने पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.