Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

Nagpur: एक हजार 927 कोटींच्या 'या' प्रकल्पासाठी लवकरच निघणार टेंडर

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : उपराजधानीच्या बहुप्रतीक्षित नाग नदी पुनरुज्जीवनप्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत बैठक घेतली. त्यात नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्तीचा मार्ग मोकळा करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महत्त्वाकांक्षी नाग नदी पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. गडकरी यांनी केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या उपस्थितीत बैठक घेत महापालिकेने सुचविलेल्या सुधारणांना केंद्रीय जलशक्ती विभागाअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाने (एनआरसीडी) मंजुरी दिली.

असा आहे प्रकल्प

प्रकल्पाचा खर्च 1 हजार 927 कोटी आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 1 हजार 115 कोटींचे सहकार्य केले जाणार आहे. तर राज्य सरकारकडून 507 कोटींचे सहकार्य केले जाईल. आणि महापालिका 304 कोटी खर्च करणार. पाचशे किमीचे सिवेज लाईन नेटवर्क केले जाईल. एक लाख 32 हजार घरांची सीवेज लाईन जोडल्या जातील. नाग नदी पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरणावर 1 हजार 927 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प विविध कारणांनी रखडला होता. महापालिकेने या प्रकल्पात काही सुधारणा सुचविल्या होत्या. त्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत व राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाच्या प्रमुख अधिकारी तसेच महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक पार पडली.

महापालिकेने प्राथमिक आराखड्यात सुचविलेल्या सुधारणांना एनआरसीडीने मंजुरी दिली. त्यामुळे आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पुढील दोन महिन्यांत सल्लागार नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. महापालिकेने सुचविलेल्या सुधारणांना एनआरसीडीच्या मंजुरीसाठीच प्रकल्प रखडला होता. आता या प्रकल्पाला वेग येणार आहे. सल्लागार नियुक्तीनंतर या प्रकल्पासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया केली जाईल, असे हा प्रकल्प सुरुवातीपासून हाताळणारे मोहम्मद इजराईल यांनी माहिती दिली.

डिसेंबरमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते होणार अनावरण

या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. त्यानंतर मागील डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरातील ऐतिहासिक नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी कोनशीलेचे अनावरण केले होते. त्यानंतर सहा महिन्यांनी या प्रकल्पाच्या कार्यवाहीला वेग आला.

ही होणार कामे

नदीत येणारे सांडपाणी अडविणे किंवा ते वळविणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र तयार करणे, प्रसाधनगृह आदी कामे या प्रकल्पांतर्गत होणार आहेत. नागपूरकरांसाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहेच, शिवाय शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने सुचविलेल्या सुधारणांना एनआरसीडीने आज मंजुरी दिली. येत्या दोन महिन्यांत प्रकल्पासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती केली जाईल. ही कंपनी सर्वेक्षण करणार असून त्यानंतर टेंडर प्रक्रिया पार पाडली जाईल. अशी माहिती महापालिका चे आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.