Bodalkasa Tendernama
विदर्भ

Gondia : नागझिऱ्यालगतच्या 'या' पर्यटनस्थळाचा होणार मेकओव्हर!

टेंडरनामा ब्युरो

गोंदिया (Gondia) : तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशय व पर्यटनस्थळ प्रसिद्ध आहे. या पर्यटनस्थळाच्या मेक ओव्हर करण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. या पर्यटनस्थळ परिसरातील विविध सुशोभीकरणाची कामे सुरू करण्यात आली असून, यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येथे मुख्य प्रवेशद्वार बांधण्यात येणार आहे, त्यामुळे बोदलकसा पर्यटनस्थळाचा लूक बदलणार आहे.

नागझिरा अभयारण्यालगत असलेल्या बोदलकसा जलाशयातील सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकारमार्फत पेन्सिल कव्हर, हँगिंग टॅग, ओपन ऑडिटोरियम व्ह्यू पॉइंट विविध ठिकाणी स्टील रेलिंगचे काम, आकर्षक सेल्फी पॉइंट आदी कामांच्या माध्यमातून उद्यानाला नवे रूप देण्याचे काम सुरू आहे.

बोदलकसा हे जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळ आहे. या पर्यटनस्थळी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. त्यामुळे या पर्यटनस्थळाचा विकास झाल्यास परिसरातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. येत्या काळात बोदलकसा हे पर्यटनस्थळ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनणार आहे.

रस्त्यांची कामे झाली सुरू

बोदलकसा पर्यटनस्थळाचा सर्वागिण विकास होऊन यातून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी बोदलकसा हे पर्यटनस्थळ नागझिरा अभयारण्याच्या जंगलात वसलेले आहे. पर्यटकांची वर्दळ लक्षात घेता गोरेगाव-तिरोडा रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. ज्यामध्ये बोदलकसा पर्यटन निवासस्थानी पर्यटकांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वाढत आहे. या पर्यटनस्थळाचा विकास झाल्यास आसपासच्या भागातील रहिवाशांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. बोदलकसा जलाशयाचे संपूर्ण चित्र बदलणार आहे.

प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकारमार्फत 2 कोटी रुपयांच्या निधीतून बोदलकसा सुशोभीकरणाची विविध कामे करण्यात येत आहे. यामुळे पर्यटनस्थळाचा विकास होऊन त्यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती आमदार विजय रहांगडाले यांनी दिली.