Ring Road Tendernama
विदर्भ

Gondia : गोंदिया जिल्ह्यातील 2 तालुक्यांसाठी गुड न्यूज; 57 कोटी मंजूर

टेंडरनामा ब्युरो

गोंदिया (Gondia) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा दोन अंतर्गत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील 41.71 कि.मी. रस्त्याच्या कामासाठी तब्बल 57 कोटी 27 लक्ष रुपयांचा निधी प्रशासकीय मान्यतेसह मंजूर करण्यात आला आहे. मान्यतेसह शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्यामुळे मतदारसंघातील विविध गावांतील दळणवळण सुविधा गतिमान होऊन वाहतुकीच्या दृष्टीने ग्रामीण जनतेला आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी या रस्त्यांच्या बांधकामासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.

57 कोटी 27 लक्ष रुपयांचा निधी रस्त्यांच्या बांधकामासाठी मंजूर करण्यात आला. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील बोंडगाव ते कढोली रामनगर रस्त्यासाठी 6 कोटी 68 लक्ष रुपये, गुढरी ते सिरेगावबांध 5 कोटी 14 लक्ष रुपये.

राज्य महामार्ग क्र. 11 ते जानवा कडगाव रस्त्यासाठी 6 कोटी 52 लक्ष रुपये, नवेगावबांध - कोडका रस्त्यासाठी 6 कोटी 63 लक्ष रुपये, राज्य महामार्ग गंधारी ते जांभळी रस्त्यासाठी 6 कोटी 11 लक्ष रुपये, राज्य महामार्ग क्र. 11 खोबा ते गोसाई कोकणा रस्त्यासाठी 5 कोटी 59 लक्ष रुपये, सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी ते मुरपार रस्त्यासाठी 6 कोटी 48 लक्ष रुपये, जिल्हा महामार्ग उसीखेडा ते दल्ली बामणी रस्त्यासाठी 6 कोटी 7 लक्ष रुपये रस्ता क्रमांक 26 परसोडी टोला ते निंबा पिपरटोलासाठी रस्त्यासाठी 692.26 रुपये लक्ष निधी मंजूर करण्यात आले आहेत.

मंजूर निधीतून लवकरच कामाला गती मिळणार आहे. लोकांना रस्ता खराब असल्यामुळे अनेक समस्यांना सामोर जावे लागत असे. पावसाळ्यात तर आणखी त्रास लोकांना होत होता. अशात महामार्गासाठी 57 कोटी मंजूर झाल्याने लोकांना आनंद होत आहे. आता कधी रस्ता पूर्ण होणार याची प्रतीक्षा लोकांना आहे.