Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

नागपुरात 'गडकरी इफेक्ट'; घोषणेनंतर अवघ्या 2 महिन्यांत काम सुरू!

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर शहरातून विना अडथळा बाहेर पडता यावे याकरिता नागपूर-अमरावरती मार्गावर दोन उड्डाणपूल निर्माण करण्याची घोषणा दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्या कामाला आजपासून प्रारंभ झाला आहे. चार पदरी उड्डाणपुलामुळे या मार्गावरून जातान वरून आणि खालून अशा आठ लेन उपलब्ध राहणार आहेत. हा प्रकल्प तब्बल ४७९ कोटींचा आहे.

या प्रकल्पांतर्गत दोन उड्डाणपुलांचा समावेश आहे. पहिला पूल शहरातील आरटीओ कार्यालयासमोर सुरू होईल. तो पुढे विद्यापीठ कॅम्पस समोर उतरले. पुढे वाडी गावातील चौक उड्डाणपुलावरून ओलांडता येणार आहे. वाडी चौक अतिशय वर्दीळीचा आहे. शेजारीच हिंगणा एमआयडीसी आहे. दुसऱ्या बाजूला वाडी गाव आहे. याच गावात मोठ्‍या प्रमाणात गोदामे आहेत. अमरावती, अकोला या मार्गाने येणाला माल येथील गोदामांमध्ये साठववला जातो. त्यामुळे या चौकात ट्रकची रांग लागली असते. जीव मुठीत घेऊनच हा चौक ओलांडावा लागतो. नागपूर- अमरावतीचे अंतर सुमारे दीडशे किलोमीटर इतके आहे. ते गाठण्यासाठी साधारण तीन तास लागतात. मात्र नागपूरमधून निघाल्यास चौका चाकातील सिग्नल आणि वाडी चौकातील वर्दळ सुमारे अर्धा तासाचा वेळ घेतात. हे दोन्ही पूल निर्माण झाल्यानंतर अमरावती अवघ्या अडीच तासात गाठता येणार आहे.

नितीन गडकरी यांनी शहरभर उड्डाणपुलांचे जाळे विणले आहेत. त्यात आणखी या उड्डाणपुलांची भर पडणार आहेत. दोन महिन्यांपूर्वीच गडकरी यांनी या पुलांची घोषणा केली होती. एनएचआय आणि राज्याच्या पीडब्ल्यूडी विभागामार्फत या पुलांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ४९७ कोटी इतकी आहे. आरटीओ ते कॅम्पस २.८ किलोमीटर तर वाडी उड्डाणपुलाची लांबी १.९४ किलोमीटर इतकी आहे.