गडचिरोली (Gadchiroli) : कोरची तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 113 शाळा आहे, यामध्ये 20 उच्च प्राथमिक शाळा आहेत. आणि तालुक्यामध्ये 34 जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींचे प्रस्ताव निर्लेखनासाठी पाठवले आहेत. 28 नवीन वर्गखोल्या बांधकामासाठी प्रस्तावित झालेल्या आहेत. चार इमारतींचे बांधकाम सध्या सुरू असून, 11 शाळेची दुरुस्ती सुरू आहे. 1 जुलैपासून जिल्हा परिषद शाळेला सुरुवात होणार आणि विद्यार्थी शाळेमध्ये येणार, परंतु मोडकळीस आणि दुरुस्ती न झालेल्या शाळेमध्ये विद्यार्थी बसणार कसे, असा प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत.
कोरची तालुक्यातील अतिसंवेदनशील भागांमधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद शाळा ही महत्त्वाची शाळा आहे. या शाळेतूनच त्यांना शिक्षण मिळते. परंतु, 34 जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम खूप जुने असल्यामुळे ते निर्लेखनासाठी प्रस्ताव पाठवलेले आहेत. तर, नवीन 28 वर्ग खोल्यांचे बांधकामाला मंजुरी मिळाली असली, तरी यावर्षी बांधकाम पूर्ण होणार नाही. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी यंदाही त्रास सहन करावा लागणार आहे. बेतकाठी, मयालघाट, कुकडेल आणि बेलारगोंदी या शाळा इमारतींचे बांधकाम सुरू आहेत. नांगपूर, हितापाडी, देऊळभट्टी, कोसमी, घुगुवा, बिहीटेकला, दोडके, बेतकाठी, मसेली या 11 शाळांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. तेरा दिवसानंतर शाळाही सुरु होणार आहे. अनेक शाळेतील वर्गखोल्या गळतीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षणासह शासकीय वस्तूंचेही नुकसान होत आहे. दोन-तीन वर्गातील विद्यार्थ्यांना एकाच खोलीत बसवून शिक्षण दिले आत आहे. त्यामुळे शिक्षणाचा खोळंबा होते आहे, याकडे लक्ष देऊन वेळेत शाळेची रिपेरिंग व नवीन बांधकामे वेळेत पूर्ण करावे.
कोरची तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 113 शाळा असून, यामध्ये 20 उच्च प्राथमिक शाळा आहेत. सध्या तालुक्यामध्ये 34 जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींचे प्रस्ताव निर्लेखनासाठी पाठवले आहेत. 28 नवीन वर्गखोल्या बांधकामासाठी प्रस्तावित झालेल्या आहेत. चार इमारतींचे बांधकाम सध्या सुरू असून, 11 शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. 1 जुलैपासून जिल्हा परिषद शाळेला सुरुवात होणार आणि विद्यार्थी शाळेमध्ये येणार, परंतु मोडकळीस आणि दुरुस्ती न झालेल्या शाळेमध्ये विद्यार्थी बसणार कसे, असा प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत. कोरची तालुक्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रात मोडणाऱ्या बोटेझरी गावातील जिल्हा परिषद शाळा मागील चार वर्षांपासून मोडकळीस आली आहे. गावातीलच बोगा यांच्या घरी शाळा भरवली जात आहे. परंतु, यावर्षी येथील शाळा प्रस्तावित झाल्यामुळे लवकर येथील बांधकाम सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. बोटेद्वारी येथे शाळा इमारतीची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ही इमारत शक्यतो जिल्हा परिषद शाळांचे बांधकामाचे काम जिल्हा परिषा व सर्व शिक्षा अभियानांतर्गत केले जात आहे. ज्या शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था नाही त्या शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे. बांधकाम लवकर होईल, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पंचायत समिती गडचिरोली चे गटशिक्षणाधिकारी अमित दास यांनी दिली.