Devendra Fadnavis Tendernama
विदर्भ

डीपीसीचा निधी खर्चण्यास भाजपकडून काँग्रेसच्या 'या' आमदारास मोकळीक

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : महाविकास आघाडीच्या कार्यकाळातील जिल्हा नियोजन समितीच्‍या खर्चाच दिलेली स्थगिती अद्याप उठवण्यात आली नसली तरी नागपूर जिल्ह्यातील उमरडे विधान सभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना मात्र रक्कम खर्च करण्यास मोकळीक देण्यात आली.

जिल्ह्यात बारा आमदार असताना एकालाच कशीकाय परवानगी दिली अशी जोरदार चर्चा सुरू आहे. बारापैकी सात आमदार भाजपचे आहेत. विशेष म्हणजे पारवे हे काँग्रेसचे आमदार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. असे असतानाही फक्त एकाच काँग्रेसच्या आमदाराला खर्चाची मुभा देण्यात आली असल्याचे जरा जास्तच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पारवे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी समृद्धी मार्गाच्या उद्‍घाटनाला आले होते. तेव्हासूद्धा पारवे आमदार म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. आता त्यांना खर्चकरण्यासाठी सूट देण्यात आली असल्याने या चर्चेला सास्तच ऊत आला आहे. पारवे यांनी भाजपचे दोन वेळा आमदार असलेले चुलत बंधून सुधीर पारवे यांना पराभूत केले आहे.

जिल्हा नियोजन समितीमधील जिल्हा परिषदेशी संबंधित कामांचा यात समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार नावीन्यपूर्ण योजना, रस्ते, जनसुविधा व नागरी सुविधांचा यात समावेश आहे. उमरेड विधानसभा मतदार संघातून राजू पारवे आमदार असून ते काँग्रेसचे आहे. सत्ताधारी पक्षात भाजप व शिंदे सेना सहभागी आहे.