Devendra Fadnavis Tendernama
विदर्भ

Nagpur फडणवीसांच्या मतदारसंघातील 'या' रस्त्यावरून चालणेही कठीण

Election: नागरिकांना आणखी 6 महिने खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार असल्याचे दिसते

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मतदारसंघातील जयताळा (Jaytala) परिसरातील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत. दररोज हजारो वाहनांची कोंडी होत असून, प्रदूषणातही वाढ झाली आहे. पादचाऱ्यांना तर रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.

नुकताच पावसाळा संपला. यावर्षी प्रचंड पाऊस झाल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. दोन महिने झाले तरी प्रशासनाने ते बुजविले नाहीत. ऐन वळणावर मोठमोठे खड्डे असल्याने सकाळी आणि सायंकाळी वाहनांच्या रांगा लागतात. नागरिकांना चालणेही मुश्कील होते.

फडणवीस मुख्यमंत्री असताना असताना महापालिकेतर्फे सर्वाधिक निधी दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात खर्च करण्यात आले होते. या मतदारसंघातील जवळपास सर्वच प्रकल्प पूर्ण करण्यात आले. मात्र असे असतानाही खराब रस्त्यांवर उपमुख्यमंत्र्यांना मात करता आली नाही. सध्या महापालिकेत प्रशासकाचे राज्य आहे. नगरसेवकांचे अधिकार संपले आहेत. त्यामुळे या रस्त्याकडे लक्ष द्यायला कोणाल वेळ नाही.

महापालिकेची निवडणूक केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक संपेपर्यंत या रस्त्याची दुर्दशा संपण्याची शक्यता सध्यातरी दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना आणखी सहा महिने खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार असल्याचे दिसून येते.

जयताळ परिसर नागपूर शहराचे शेवटचे टोक आहे. पूर्वी शहराजवळचे एक छोटे गाव म्हणून जयताळ्याला ओळखल जात होते. मात्र मागील दह वर्षांत प्रचंड मोठ्या प्रमाणात या भागाचा विस्तार झाला आहे. बिल्डर्ससाठी सर्वाधिक पसंतीचा हा परिसर झाला आहे. मोठ मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे लोकसंखेत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. आता जयताळ्याचा रस्ता वर्दळीचा झाला असून, यावरचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे.