Tender Tendernama
विदर्भ

Bhandara : स्थानिक ठेकेदारांना वंचित ठेवणारे 68 कोटींचे 'हे' टेंडर रद्द करण्याची मागणी 

टेंडरनामा ब्युरो

भंडारा (Bhandara) : कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या टेंडर प्रक्रियेत सहभागी होण्यापासून स्थानिक कंत्राटदारांना वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ही टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे.

निवेदनानुसार मुख्यमंत्र्यांनी 15 जुलै रोजी ग्रामसडक योजनेअंतर्गत टेंडर काढले. त्यामुळे तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघातील सुमारे 43 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी शासनाने 68 कोटी 25 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली. रविवार 29 जुलै रोजी टेंडर काढण्यात आले. ज्यामध्ये स्थानिक ठेकेदार सहभागी होऊ शकले नाहीत. 

महाराष्ट्र अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांनी  सांगितले की, दोन्ही तहसीलमध्ये करावयाच्या कामाच्या टेंडरमध्ये अनेक अटींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकही ठेकेदार यात सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे स्थानिक ठेकेदारांमध्ये नाराजी आहे. सार्वजनिक कामाचे टेंडर काढताना त्यात अंदाजित रकमेसह तांत्रिक प्रशासकीय मान्यतेचा विचार करावा लागतो. हे करत असताना सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना काम मिळावे यासाठी स्थानिक पातळीवरील नियमित कंत्राटदारांचेही लक्ष ठेवले जाते. मात्र हे करण्यात आले नाही. त्यामुळे हे टेंडर रद्द करण्यात यावे अशी मागणी स्थानिक ठेकेदारांनी केली आहे.  68 कोटी 25 लाख चे निघालेले टेंडर रद्द करण्याची मागणी कार्यकारी अभियंताला निवेदन देऊन करण्यात आली. जर का स्थानिक ठेकेदारांना हे टेंडर नाही दिले तर कठोर पाऊल उचलु अशी चेतावनी सुद्धा ठेकेदारांनी दिली आहे.