Buldhana Tendernama
विदर्भ

Buldhana : विदर्भ - मराठवाड्याला जोडणारा 'या' पुलाचे काम 2 वर्षांनंतरही अर्धवट का?

टेंडरनामा ब्युरो

बुलडाणा (Buldhana) : विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा लिंगा देवखेड येथील खडकपूर्णा नदीपात्रातील मंजूर पुलाचे काम हे 2022 पासून सुरू करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही काम हे अतिशय संथ गतीने होत आहे येत्या पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

लिंगा देवखेड येथील पुलाचे काम सुरू करण्यात यावे या मागणीसाठी गजेंद्र देशमुख यांनी 14 मार्च 2022 रोजी खडकपूर्णा नदीपात्रात उपोषण केले होते. त्यांच्या उपोषणाची दखल घेत हे काम सुरू करण्यात आले, परंतु काहीच दिवसांत काम नदीपात्रातील पाण्याचे कारण दाखवत पुन्हा बंद करण्यात आले.

2022 मध्ये जेवढे काम झाले तेवढेच काम सद्यस्थितीला दिसत असून, अजून किती वर्ष पुलाच्या बांधकामासाठी लागणार आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, सदर पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करत आहे.

विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा लिंगा देवखेड पुलासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. या पुलाचे काम 2022 मध्ये सुरू करण्यात आले आहे. पण नदीपात्रातील पाण्याचे कारण दाखवत सदर काम बंद करण्यात आले होते. पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येणार, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते गजेंद्र देशमुख यांनी दिली.

या पुलाचे बांधकाम 2022 मध्ये सुरू करण्यात आले होते व त्यानंतर नदीपात्रातील पाण्याचे कारण दाखवत काम बंद करण्यात आले होते, परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे नदीपात्र कोरडे असताना सुद्धा अद्यापही काम सुरू करण्यात आले नाही. या पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी रेवती आढाव, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदखेड राजा यांनी केली आहे.