Bhandara Tendernama
विदर्भ

Bhandara : 336 कोटींच्या 'या' प्रकल्पामुळे होणार हरितक्रांतीचे लक्ष्य पूर्ण?

टेंडरनामा ब्युरो

भंडारा (Bhandara) : वैनगंगा नदी जिल्ह्याची लाइफलाइन म्हणून ओळखली जाते. नदीमुळे पश्चिमेकडील संपूर्ण पट्टा समृद्ध आहे. परंतु, पूर्वेकडील कोका वन्यजीव अभयारण्य व न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या डोंगराळ भागात सिंचनाचा दुष्काळ वर्षानुवर्षांपासून कायम आहे. सिंचनाची समस्या दूर व्हावी, शेतकरी समृद्ध व्हावा, या हेतूने 26 नोव्हेंबर 2006 मध्ये सुरेवाडा उपसा सिंचन योजनेला मान्यता देण्यात आली. परिणामी, आजघडीला तीन तालुक्यांतील 7 हजार हेक्टर सिंचनाचे लक्ष्य या योजनेने पूर्ण होणार आहे.

22 गावांतील शेतीला मिळणार पाणी :

सुरेधाहा उपसा सिंचन योजनेच्या पूर्णत्वामुळे भंडारा तालुक्यातील गावातील 843.81 हेक्टर, मोहाडी तालुक्यातील कडी परिसरातील 20 गावांतील 6109.13 हेक्टर तर तिरोडा तालुक्यातील एकमेव गावातील 16.57 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. एकूण 28 सुमारे 7050 गावांतील शेतीला ओलिताची सोय उपलब्ध होणार आहे.

लघु कालवे 41.13 किमी लांबीचे  :

या प्रकल्पाचा मुख्य कालवा 26.24 किमी लांबीचा राहणार असून, 00 ते 10 किमीमध्ये मातीकाम व बांधकामे प्रगतिपथावर आहेत. तर 10 ते 16 किमीमधील मातीकामाचे अंदाजपत्रक तयार आले आहे. लघु कालवे 41.30 किमी लांबीची राहणार असून, संकल्पना व अंदाजपत्रकासाठी सर्वेक्षणाच्या कामांची निविदा काढण्यात आली आहे. सुरेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाची किंमत 68.58 कोटींची होती. परंतु, वनजमीन मान्यता, वन व पर्यावरण, जल नियमन प्राधिकरण, नियामक ठराव आदी विभागाच्या मान्यतेसाठी प्रकरण अडकून पडले होते. या कालावधीत प्राप्त निधीतून पंपगृह, यांत्रिकी कामे, लोखंडी ऊर्ध्वनलिका, फोरवे, जलविद्युत विभागाकडून वीज जोडणी, कळयंत्र आवार आदींची कामे सध्या 180 ते 95 टक्के पूर्ण झाली आहेत, दीर्घ विलंबामुळे प्रकल्पाची किंमत वाढली होती. अखेर सुधारित 336 कोटींच्या प्रस्तावास 8 डिसेंबर 2022 मध्ये राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. वर्षभरापासून मुख्य कालवा, 2 मीटर व्यासाचे पाइप 6 फूट जमिनीखाली दाबण्याचे काम धडाक्यात सुरू आहे. सुरेवाडा उपसा सिंचन योजना मध्यम प्रकल्प असून, सन 2028 पर्यंत पूर्ण होईल. पंप हाऊस, वीज जोडणी आदींचे बहुतेक काम लवकरच पूर्ण होईल. मुख्य कालव्याचे काम सुरू आहे. यामुळे भंडारा, मोहाडी गावातील कोरडा दुष्काळ संपण्यास मदत होईल. शेती व शेतकरी समृद्ध होईल. अशी माहिती गोसे खुर्द उपसा सिंचन विभाग, आंबाडीचे कार्यकारी अभियंता अ. वी. फरकडे यांनी दिली.