Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : नाला भिंत, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हवेत 241 कोटी

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : अतिवृष्टीमुळे नाग नदीसह नाल्यांना पूर आल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 10 हजार मीटरच्यावर नाल्याची भिंत खचली असून 37 हजार मीटर रस्त्याचे नुकसान झाले. याच्या दुरुस्तीसाठी अंदाजे 241 कोटींची गरज लागणार आहे.

पुरामुळे शहरातील 11,238 घरे, 300 दुकाने व पानटपरी बाधित झाली. 5 घरे पूर्णतः क्षतीग्रस्त तर 149 घरांचे अंशत: नुकसान झाले. नदी-नाल्यावरील 3 पूल खचले. यात पंचशील टॉकीज जवळील नागनदीचा पूल, सर्वश्री नगर व तारकेश्वरनगर येथील पुलाचा समावेश आहे. 102 ठिकाणी नदी, नाल्यावरील जवळपास 10,301 मीटरची सुरक्षा भिंत कोसळली. याच्या दुरुस्तीसाठी 200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर 37,190 मीटर रस्त्याचे नुकसान झाले आहे.

यासाठी जवळपास 41.39 कोटीचा खर्च येणार आहे. चार व्यक्तींसह 14 गुरांचा मृत्यू झाला. तर 600 घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती यावेळी प्रशासनाने दिली. जिल्हा नियोजन समितीच्या लघु गटाचे अध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेऊन मदतीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याच्या सूचना केल्याची माहिती आहे.