Sarva Shiksha Abhiyan Tendernama
विदर्भ

Amravati : 'या' 10 जिल्ह्यांसाठी खुश खबर; वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी 3.14 कोटींचा निधी

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : राज्यात समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत 10 जिल्ह्यांतील 114 वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी 3.14 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये अमरावती विभागातील 64 वर्ग खोल्याकरिता सुमारे 1 कोटी 62 लाख 50 हजारांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतच शाळाखोली बांधकामाला सुरुवात होणार असून यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय थांबणार आहे.

राज्यात समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत 10 जिल्ह्यांतील 114 वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी 3.14 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये अमरावती विभागातील अकोला, वाशिम आणि अमरावती अशा तीन जिल्ह्यातील 65 वर्ग खोल्याचा कायापालट होणार आहेत. याकरिता 1 कोटी 62 लाख 50 हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. पुढील काही दिवसांतच शाळाखोली बांधकामाला सुरुवात होणार असून यामुळे विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेची अडचण दूर होणार आहे.

राज्यात अनेक ठिकाणी 33 जिल्हा परिषद शाळांमधून अपुऱ्या वर्ग खोल्या 5 असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बसण्याच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नवीन वर्ग खोल्या बांधकामाची  मागणी केली जात होती. त्यासाठी जिल्ह्यांनी नवीन बांधकामाचा प्रस्ताव वर्गखोल्या देखील समग्र शिक्षा अभियानाकडे सादर केले होते.

त्यानुसार, शाळा खोल्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. यामध्ये 10 जिल्ह्यांत 114 वर्ग खोल्या बांधल्या जातील. यात अकोला जिल्ह्यात 27 खोल्यांसाठी 46.50 लाख रुपये, अमरावतीत 26 खोल्यांसाठी 83 लाख रुपये, तर वाशीम जिल्ह्यात 11 वर्ग खोल्यांसाठी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यात शाळा वर्गखोल्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांतच वर्गखोली बांधकामासाठी टेंडर प्रक्रिया राबवून तातडीने बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे.