Nashik

 

Tendernama

उत्तर महाराष्ट्र

टेंडर काढून काम न करताच ५० कोटींचा गंडा; अधिकाऱ्यांवर गुन्हा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : कृषी विभागाच्या कामांचे टेंडर (Tender) काढून प्रत्यक्षात कुठलेही काम न करता कागदोपत्री कामे केल्याचे दाखवून सुमारे पन्नास कोटीचा गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे. एका मजूराच्या तक्रारीनंतर वाचा फुटलेल्या या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर पेठ तालुका पोलीस ठाण्यात कृषी विभागातील १६ आधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

फसवणूकीचा गुन्हा दाखल झालेल्यात ८ कृषी सहाय्यक, चार कृषी पर्यवेक्षकांसह तीन ते चार कृषी मंडळ आधिकाऱ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी तक्रारदार योगेंद्र उर्फ योगेश सुरेश सापटे (वय ३६, हेदपाडा (एकदरा) ता. पेठ जि. नाशिक यांच्या न्यायालयातील तक्रारीवरुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाच्या आदेशानंतर (क्रिमिनल केस क्र. २८/२०२१) कृषी सहाय्यक नरेश शांताराम पवार (वय ५०,.दोडाईचा ता.शिंदखेडा जि.धुळे, दगडु धारु पाटील (वय ५५, कहांडोळ ता.शहादा जि.नंदुरबार, संजय शामराव पाटील (वय ४६, धुळे ) विठ्ठल उत्तम रंधे (वय ३४, एरंडगांव ता. येवला जि.नाशिक, दिपक पिराजी कुसळकर (वय २९, जि. नगर, दिलीप ज्ञानदेव फुलपगार (वय ३५,आंबाळे ता. शिरुर जि.पुणे, प्रतिभा यादवराव माघाडे (वय ३४, दिंडोरी जि.नाशिक, राधा चिंतामण सहारे (वय ३४, कुकडणे ता. सुरगाणा जि.नाशिक (सर्व कृषी सहाय्यक) दिलीप औदुंबर वाघचौरे (वय ५२, कृषी पर्यवेक्षक सोलापुर ता. जि.सोलापुर, मुकुंद कारभारी चौधरी (वय ३५, कृषी पर्यवेक्षक, रा. उंबरी ता.राहुरी जि. नगर, किरण सिताराम कडलग (वय ३६, कृषी पर्यवेक्षकजवळे कडलग ता. संगमनेर जि. नगर), विश्वनाथ बाजीराव पाटील (वय ४८, मंडळ कृषी अधिकारी, परधाडे ता. पाचोरा जि.जळगांव), अशोक नारायण घरटे (वय ५०,मंडळ कृषी अधिकारी, सांगुडे ता. साक्री जि.धुळे, एम.बी.महाजन (वय ३३, कृषी अधिकारी पेठ नाशिक, सरदारसिंग उमेदसिंग राजपुत (वय ४८, तालुका कृषी अधिकारी चाळीसगांव ता. पाचोरा जि.जळगांव, शिलानाथ जगनाथ पवार (वय ४२, तालुका कृषी अधिकारी मानुर ता. कळवण जि.नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्या १६ संशयितांची नावे आहेत.

काय आहे तक्रार
सरकारने आदिवासी उपयोजने अंतर्गत जलसंधारण विभाग मृद सुधारणाच्या कमार्टमेन्ट, नाला बंडिग, ढोळीचे बांध, दगडी बांध, मजगी, सलग,समतल,चर, खोल सलग समतल,चर मातीचे बांध नुतनीकरण व जुनी भात शेती दुरुस्तीची २०११ ते २०१७ दरम्यान पेठ तालुक्यात गतिमान मजगी दगडी बांध, पाणलोट मजगी दगडी बांध या दोन योजनात बोरवठ, कोटंबी, उस्थळे, हनुमंतपाडा, बेहडमाळ, जामुनमाळ, एकदरे,हेदपाडा,उभीधोंड, मांगुणे,पातळी,गावंदपाडा, उंबरपाडा, जांबविहीर आड बु., गोंदे, डोलारमाळ, भायगांव,करंजाळी, शिंगदरी,देवगांव ता. योजना राबविण्यात आलेल्या आहेत. त्या करीता शासनाने निविदा काढुन मृद संधारणाची कामे ही यंत्राचे सह्याने करण्याच्या मजुरा मार्फत कामे करणेकामी जाहीरात प्रसिद्ध केली होती.

स्टॅम्प पेपर अन सह्या..
तक्रारदार योगेंद्र उर्फ योगेश सुरेश सापटे हेदपाडा (एकदरा) ता. पेठ जि. नाशिक येथील रहिवाशी असुन, शेती कामाशिवाय ते छोटा शेतकरी असुन, उदर निर्वाहासाठी वडिलांचा ट्रक्टर (एम.एच. १५ सी.व्ही ७३६१) आहे. त्याद्वारे वडिलांच्या नावे कंत्रांटी काम करतात. टेंडरनुसार, एका ट्रॅक्टर चालकाला २५ लाखांच्या कामांसाठी जिल्हा स्तरावर प्रसिद्ध झाल्याने तक्रारदाराने वडीलांच्या ट्रक्ट्ररची नोंदणी करीत, २०००/- बँकेत भरुन निवीदा भरली, कागदपत्रांची पुर्तता करुन तालुका कृषी विभाग पेठ येथे. १०० रुपयांच्या स्टँम्प पेपर दिला होता. त्यावर सरकारच्या हमीपत्र करुन नोंदविण्यासाठी कोऱ्या स्टँम्पवर पेठच्या तालुका कृषी आधिकाऱ्यांनी कोऱ्या स्टॅम्पवर आणि कोऱ्या ५० पावत्यांवर सह्या घेतल्या.

१४७ शेतकऱ्यांचे जमीन सपाटीकरण
पाणलोट योजनेचे कामात या स्टॅम्प पेपर व पावतींच्या आधारे संशयितांनी पेठ तालुक्यातील १० गावात ३ कोटी १४ लाख ०४ हजार ५०४ कामांना मंजूरी देऊन पेठ तालुक्यात ५० कोटी ७२ लाख ७२ हजार ६४ रुपयांची पाच वर्षात ट्रॅक्टर धारक व गावतील ३५ मजुरांनी मिळुन ही कामे केल्याचे दाखविली अशी तक्रारदाराची तक्रार आहे . त्यातील १४७ शेतक-यांच्या गटात जमीन सपाटीकरणासाठी ४ ट्रॅक्टर वापरले गेले. ३५ मजुरांनी ६१० दगडी बांधकाम केले. असे पाच वर्ष काम केल्याचे दाखविल्याची तक्रार आहे. २०११ ते २०१७ या कालावधीत शासनामार्फत समांतर दोन योजना सुरु होत्या. त्यात, पहिल्या योजनेत गतिमान मजगी दगडी बांध जे खाचर १८ ते २० मी. लांबी बाय ११ मी. पुढे रुंदी या एक खाचराकरीता शासन दरपत्रक अंदाजे २५०० ते ४००० वस्तुस्थीतीनुरुप मंजुर होती. परंतु मजुर व ट्रँक्टर ग्रुपधारक यांना सर्वांना मिळुन रुपये २० हजार रुपयेच दिले जात. पण प्रत्यक्षात एक लाख साठ हजार रुपये मिळणे आवश्यक असतांना त्यांच्या नावावरील पैसे आरोपींनी परस्पर काढले. तर दुसरी पाणलोट मजगी दगडी बांध ही दुसरी योजना समांतर राबविली असे दाखवुन त्यांची कामे ट्रँक्टर नोंदणीधारक व मजुरांकरवी करुन घेवुन पररस्पर मजुरांच्या सह्या को-या सह्या चेकवर तिकीटे लावुन कोऱ्या आगाऊ पावतीवर घेऊन त्या मजुरांचे नावे परस्पर पैसे काढले गेले व पाणलोट मजगी दगडी बांध या योजनेतील एक पैसा देखील गरीब अशिक्षीत अडाणी आदीवासी लोकांना अंधारात ठेवुन व शासनाचे खोटे कागपत्राचे आधारे फेरफार व खोट्या नोंदीवरुन फसवणूक करुन स्वत:चा फायदा व्हावा हा हेतु डोळ्यासमोर ठेवुन संगमनमताने सर्व आरोपी यांनी फिर्यादी मजुर व सरकारची दिशाभूल करुन
फसवणुक केल्याची तक्रार आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला आहे त्यानुसार ग्रामीण पोलिसांकडून
माहीती घेण्याचे काम सुरु आहे. संशयितांनी सरकारी कामे न करता ती केल्याचे
दाखवून हा गैरव्यवहार केल्याचे तक्रारीत म्हटले असून माहिती घेतली जात आहे.
- सचिन पाटील (पोलिस अधीक्षक नाशिक)