Khed Shivapur Toll Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : सिन्नर-शिर्डी 45 किमी प्रवासासाठी भरावा लागणार एवढा टोल

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : अनेक वर्षांपासून सुरू असलेले सिन्नर-शिर्डी या ४५ किलोमीटरचे पूर्ण झाले असून, त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी टोल आकारण्यास प्रारंभ झाला आहे. मागील आठवड्यात या टोलची चाचणी घेतल्यानंतर लगेचच टोल लागू केला आहे. यासाठी सिन्नर तालुक्यातील पिंपरवाडी येथे टोल प्लाझाची उभारणी करण्यात आली आहे. या रस्त्यावरून प्रवासासाठी कार चालकांना ४५ किलोमीटर प्रवासासाठी ७५ रुपये टोल द्यावा लागणार आहे.

सिन्नरमार्गे शिर्डीला जाण्यासाठी यापूर्वी सिन्नर शहरातून जावे लागत होते. त्यामुळे सिन्नर शहरात मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी होत असे. यातून सुटका करण्यासाठी सिन्नर शहराच्या बाहेरील वळण रस्त्याला जोडून नवीन सिन्नर-शिर्डी मार्ग तयार करून तो जुन्या शिर्डी रस्त्याला जोडण्यात आला आहे. या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम गेले तीन-चार वर्षांपासून सुरू होते. ते काम आता पूर्ण झाले असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणने आता त्यावर टोल आकारणी लागू केली आहे. नाशिक पुणे महामार्गापासून ते शिर्डी या ४५ किलोमीटरच्या अंतरासाठी हा टोल लागू राहणार असून त्यासाठी टोल प्लाझापासून २० किलोमीटर परिघातील नागरिकांना या मासिकपासच्या माध्यमातून सवलत दिली जाणार आहे. तसेच टोलपासून  किलोमीटर परिसरातील वाहन धारकांना मासिक ३३० रुपये टोल आकारणी केली जाणार आहे.

मुंबई व गुजरातमधून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना सिन्नरमार्गे जावे लागते. यापूर्वी सिन्नर ते शिर्डी हा दुपरी मार्ग होता. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाणही अधिक होते. यामुळे अनेक वर्षांपासून या मार्गाचे चौपदरीकरण करण्याची मागणी होती. अखेर सिन्नर-शिर्डी या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले असून नाशिक पुणे महामार्गाच्या सिन्नर बाह्यवळण रस्त्यापासून ते शिर्डीपर्यंत हा रस्ता चौपदरी करण्यात आला आहे. या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने आता प्रवाशांची सिन्नर शहरातील वाहतूक कोंडीपासून सुटका झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात नोंदणी केलेल्या वाहन धारकांसाठी या टोलवर सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार इतर जिल्ह्यातील वाहनांसाठी असलेल्या टोलच्या तुलनेत ही सवलत जवळपास पन्नास टक्के असल्याचे दिसत आहे. त्यानुसार कार,जीप, व्हॅन यांच्यासाठी  रुपये टोल आकारला जाणार आहे. तसेच अवजड वाहनांसाठी ५०० रुपये टोल आकारणी केली जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने जाहीर केल्यानुसार आता सिन्नर- ते शिर्डी या प्रवासाठीचे एकेरी प्रवासाचे दर पुढील प्रमाणे आहेत.
कार/जीप/ व्हॅन/ एलएमव्ही : ७५ रुपये
एलसीव्ही/ एलजीव्ही/ मिनी बस : १२५ रुपये
बस/ट्रक : २६० रुपये
तीन ॲक्सल व्यापारी वाहन : २८५ रुपये
एचसीएम/ इएमई/ एमएव्ही चार ते सहा ॲक्सल : ४१० रुपये
अवजड वाहन सात ॲक्सलवरील : ५०० रुपये