Nashik Z P Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिक जिल्हा परिषद ग्रामपंचायतींना देणार 21 कोटींचे कर्ज

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : ग्रामपंचायतींला उत्पन्नाचा हक्काचा स्त्रोत निर्माण व्हावा यासाठी जिल्हा परिषदेकडून ग्रामनिधी कर्ज घेतल्यानंतर ग्रामपंचायती कर्ज परतफेडीकडे पाठ फिरवतात. त्यामुळे जिल्ह्यातील 68 ग्रामपंचायतीकडे 12 कोटी 68 लाख रुपये थकित आहे. यामुळे जिल्हा परिषदेने या थकित कर्ज वसुलीसाठी मोहीम सुरू केली असून, त्याचे फलित म्हणजे जिल्ह्यातील 7 ग्रामपंचायतीनी एक कोटी सात लाख रुपयांचा भरणा केला आहे. 

कर्ज घेतलेल्या 68 ग्रामपंचायतींकडे 12 कोटी 83 लाख रुपये थकीत आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने यंदा ग्रामनिधीतून 21 कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट याविभागाने ठेवले आहे. जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग ग्रामपंचायतींना विकासासाठी 5 टक्के व्याजाने कर्जपुरवठा करतो. संबंधित ग्रामपंचायतीचे गेल्या तीन वर्षातील आर्थिक व्यवहार, कर्ज घेण्याचा उद्देश आणि कर्ज परतफेडण्याची क्षमता तपासली जाते. कर्ज घेतल्यानंतर किमान 10 हप्त्यांमध्ये म्हणजेच दहा वर्षांमध्ये त्याची परतफेड करण्याची अट असते. जिल्ह्यातील 74 ग्रामपंचायतींना 17 कोटी 20 लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. त्यातील 68 ग्रामपंचायतींकडे अजूनही 12 कोटी 83 लाख रुपये थकीत आहे. या कर्ज रकमेतूनव्यापारी गाळे, बहुउद्देशिय इमारत, शॉपिंग सेंटर, ग्रामपंचायत इमारत बांधकाम केले जाते.  सिन्नर तालुक्यातील वडांगळी, चास, नाशिकच्या गंगापूर, जाखोरी दिंडोरीतील उमराळे, कळवण तालुक्यातील अभोणा-१ या ग्रामपंचायतींनी स्वयंस्फुर्तिने एक कोटी सात लाख रुपये कर्जाची परतफेड केली आहे. 

21 कोटीचे कर्ज देणार

ग्रामपंचायतींना कर्ज स्वरुपात वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत विभागाकडे 21 कोटी रुपये ग्रामनिधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे पात्र ग्रामपंचायतींना या योजनेअंतर्गत व्यापारी गाळे, बहुउद्देशिय इमारत, शॉपिंग सेंटर, ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. 

कर्ज थकवलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती

बागलाण: लखमापूर, मुल्हेर, खिरमाणी, नामपूर, जोरण, अजमेर सौंदाणे, विरगाव, वायगाव, तळवाडे (दि.), आराई 

चांदवड : आसरखेडे, चांदवड, वाहेगाव साळ

नांदगाव : वाखारी, पानेवाडी

नाशिक : मखमलाबाद, अंबड खु., ओढा, चांदशी, पिंप्री सय्यद

सिन्नर : सोनांबे, पाथरे बु., पाथरे बु-२, सोमठाणे, मनेगाव, मुसळगाव, पाथरे, वारे, गोंदे, वावी, माळेगाव

निफाड : साकोरे, शिवडी, ओझर मिग-३, रानवड, खडक माळेगाव, शिंगवे, साकोरे मिग, सायखेडा, दावचवाडी, नांदुर्डी, लासलगाव, करंजगाव, खेडे

दिंडोरी : बोपेगाव, लखमापुर-३, तिसगाव, वरखेडा, सोनजांब, करंजवण

मालेगांव : करंजवण -१, करंजगव्हाण-२, दाभाडी-३, निलगव्हाण, नांदगाव बु., मुंगसे, टेहरे, वडेल, झोडगे, चंदनपुरी, टोकडे, रावळगाव

कळवण : अभोणा-२, सप्तशृंगगड

देवळा : उमराणे, वासूळ, वासोळ

येवला : आडगाव