Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : 25 कोटींच्या मॉडेलरोडसाठी सीबीएस ते कॅनडाकॉर्नर मार्गावर दीड वर्षे केवळ एकेरी वाहतूक

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : सीबीएस सिग्नल ते कॅनडा कॉर्नर या दरम्यान महापालिकेकडून २५ कोटींचा मॉडेल रोड उभारण्याचे काम सुरू झाले असून हे काम एकूण अठरा महिने चालणार आहे. यामुळे हा मार्ग नोव्हेंबर २०२५ पर्यंत केवळ एकेरी वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. याबाबत वाहतूक शाखेकडून पर्यायी मार्गांचा तपशील जारी केला आहे.

नाशिक महापालिकेच्या २०२३-२४ या वर्षाच्या अंदाजपत्रकानुसार बांधकाम विभागाने नवीन रस्ते या लेखाशीर्षाखाली १०० कोटींची रस्ते प्रस्तावित केली होते. त्यात सीबीएस ते कॅनडा कॉर्नर आणि कॅनडा कॉर्नर ते गंगापूर नाका या काटकोनातील मॉडेल रोडसाठी २५ कोटी रुपये प्रस्तावित करून त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली होती. एवढ्या मोठ्या निधीच्या कामाला केवळ दोन कोटी रुपये तरतूद केल्याचे महापालिकेच्या लेखा विभागाने याला आक्षेप घेतला होता. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी या रस्त्याला मंजुरी दिल्याने लेखा विभागानेही आक्षेप मागे घेतला. तसेच महापालिकेने २०२४-२५ च्या अर्थसंकल्पातही यासाठी तरतूद केली असून या प्रस्तावित मॉडेलरोडमधील जुने सीबीएस सिग्नल ते कॅनडा कॉर्नर या एक हजार तीनशे मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरवातीला केले जाणार आहे. महापालिकेतर्फे हा मार्ग मॉडेल रोड म्हणून विकसित केला जातो आहे. अठरा महिने टप्याटप्यात हे काम होणार आहे. रस्त्यांवरील एकेरी मागनि काम करण्यासाठी वाहतूक - बंद ठेवली जाईल. या मार्गात वाहने उभे करण्यास प्रतिबंध केलेला आहे. वाहतूक नियंत्रण व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काही बदल वाहतूक शाखेने जाहीर केले आहेत. वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

या मार्गावर वाहतूक बंद
-
कॅनडा कॉर्नर सिग्नलकडून सीबीएस सिग्नलकडे जाणाऱ्या मार्गावर बंदी
- ठक्कर बाजारकडून मेळा बसस्थानकाकडे येणाऱ्या मार्गावर बंद
 - जलतरण तलाव सिग्नलकडून टिकवाडी सिग्नलमार्गे सीबीएसकडे जाणारा मार्गात प्रवेश बंदी
 - राका कॉलनी गार्डनकडून सीबीएसकडे येणाऱ्या सर्व वाहतुकीस बंदी
 - ठक्कर नगरकडून कुलकर्णी गार्डनमार्गे सीबीएसकडे येणारा मार्ग बंद
 - नवीन पंडित कॉलनीकडून सुश्रुत हॉस्पिटल, राका गार्डनमार्गे सीबीएसकडे जाणाऱ्या मार्गात प्रवेश बंदी
 - जुनी पंडित कॉलनीकडून टिळकवाडी सिग्नलमार्गे सीबीएसकडे जाणारा मार्ग असेल बंद