Nashik Municipal Cororation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिक महापालिकेचा अजब निर्णय; आता विद्युत पोल भाड्याने देणार

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : तहान लागल्यावर विहीर (Well) उपसण्याचा प्रकार सध्या नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) विविध कर विभागात सुरु आहे. पालिकेच्या घटलेल्या उत्पन्नात अधिक भर घालण्यासाठी विद्युत पोल भाडे तत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी दर कमी करून टेंडर (Tender) जाहीर करण्यात आली असून पाच हजार पोल दहा वर्षांसाठी भाडे तत्वावर दिले जाणार आहे.

घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी पाचशे कोटींच्यावर पोहोचल्याने महापालिकेच्या उत्पन्नात घट झाल्याने घट भरून काढण्यासाठी विविध कर विभाग सरसावला आहे. थकबाकी वसुल करण्यात अपयश येत असल्याने उत्पन्न वाढीसाठी आता विद्युतपोलवर जाहीरातबाजी केली जाणार आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांवरील ९२२ तर इतर प्रमुख मार्गावर ४,१२३ पथदिप जाहिरातींसाठी दिले जाणार आहेत. अ गट पथदिपांसाठी प्रत्येकी पोल ६०० रुपये तर ब गटासाठी प्रत्येकी ४०० रुपये पोल जाहिरात शुल्क निश्चित केले होते. परंतू दहा वेळा टेंडर काढून प्रतिसाद न मिळाल्यने अखेरीस जाहिरात शुल्क दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकूण ५०४५ पोल जाहिरातीसाठी देताना सव्वा कोटी रुपये महसूल अपेक्षित आहे.