नाशिक (Nashik) : इंडिगो (Indigo) या आघाडीच्या विमान वाहतूक कंपनीच्यावतीने ओझर विमानतळावरून २९ ऑक्टोबरपासून विमानसेवेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार नाशिक येथून राजधानी दिल्लीसह देशातील सर्व प्रमुख शहरांना विमानसेवा सुरू होणार आहे. ही सेवा काही शहरांमध्ये थेट आहे, तर काही ठिकाणी हॉपिंग स्वरुपाची आहे. यामुळे नाशिक येथून देशातील कोणत्याही मोठ्या शहरात जाण्यासाठी आता विमानसेवा उपलब्ध होणार आहे.
इंडिगो कंपनीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या नवीन वेळापत्रकानुसार नशिक येथून गोवा, अहमदाबाद, हैदराबाद, इंदूर, अमृतसर, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, कोइम्बतूर, डेहराडून, दिल्ली, जयपूर, जैसलमेर, कोची, कोलकता, लखनौ, तिरुअनंतपुरम, वाराणसी, आग्रा, चंडीगड, कोची, कोलकता, रायपूर, श्रीनगर, विजयवाडा या महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा सुरू केली जाणार आहे.
यातील उत्तर गोवा, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, इंदूर या सेवा थेट असणार आहे. उर्वरित सेवा हॉपिंग फ्लाईट प्रकारातील आहे. इंडिगो कंपनीने जाहीर केलेले नवीन वेळापत्रक २९ ऑक्टोबरपासून हिवाळ्यातील हंगामासाठी असणार आहे. त्यानंतर पुन्हा नव्याने वेळापत्रक जाहीर केले जाईल, अशी माहिती निमा एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष मनीष रावल यांनी दिली.
अशी असणार थेट विमानसेवा
- नाशिक - उत्तर गोवा : दुपारी एकला ओझर विमानतळावरून उड्डाण होईल व २.३५ मिनिटांनी पोचेल.
- उत्तरगोवा-नाशिक : २.५५ मिनिटांनी उत्तर गोवा येथून उड्डाण होईल व सायंकाळी ४.५० मिनिटांनी ओझर विमानतळावर पोचेल.
- नाशिक-अहमदाबाद : ओझर विमानतळावरून अहमदाबादसाठी दोन फ्लाइट आहे. नाशिकहून अहमदाबादसाठी रात्री ९.२५ मिनिटांनी उड्डाण होईल व १०.५० मिनिटांनी अहमदाबाद येथे पोचेल. अहमदाबाद येथून सायंकाळी ७.४० मिनिटांनी उड्डाण होईल व नाशिकच्या ओझर विमानतळावर ९.०५ मिनिटांनी आगमन होईल. सकाळी ९.१५ अहमदाबाद येथून उड्डाण होईल व १०.३५ मिनिटांनी ओझर विमानतळावर विमान उतरेल. ११.०५ मिनिटांनी पुन्हा अहमदाबादसाठी उड्डाण होईल व दुपारी १२.३० ला अहमदाबादला पोचेल.
नाशिक - नागपूर : ओझर विमानतळावरून सकाळी ८.१० ला उड्डाण होईल व ९.५० मिनिटांनी नागपूरला पोचेल. नागपूरहून सायंकाळी सातला उड्डाण होईल व रात्री ८.४५ वाजता ओझर विमानतळावर आगमन होईल.
नाशिक- हैदराबाद : ओझरहून ५.२५ वाजता उड्डाण होईल व ७.१५ मिनिटांनी हैदराबादला पोचेल. हैदराबादवरून सकाळी १०.५० मिनिटांनी उड्डाण होईल व दुपारी १२.३५ मिनिटांनी आगमन होईल.
इंदूर-नाशिक : इंदूर येथून सकाळी ६.४५ वाजता उड्डाण होईल व सकाळी ७.५० वाजता ओझर विमानतळावर आगमन होईल. ओझर येथून रात्री ९.०५ मिनिटांनी उड्डाण होईल व १०.१५ वाजता इंदूर येथे आगमन होईल.
अशी असणार हॉपिंग विमान सेवा
नाशिक-गोवा-अमृतसर : उड्डाण दुपारी एक; आगमन रात्री ११.३०
नाशिक-हैदराबाद-बंगळूर : उड्डाण सायं.७.२५; आगमन रात्री १०
नाशिक-भोपाळ- अहमदाबाद : उड्डाण स.११.०५; आगमन रात्री ७.४५
नाशिक- हैदराबाद-भुवनेश्वर : उड्डाण सायं.७.२५; आगमन रात्री १०
नाशिक- गोवा-चेन्नई : उड्डाण दु. १; आगमन सायं. ५.५०
नाशिक-नागपूर-दिल्ली : उड्डाण स.८.१०; आगमन दु. १.३५
नाशिक-अहमदाबाद-जयपूर : उड्डाण रात्री८.२५; आगमन सकाळी ११.०५
नाशिक-हैदराबाद-कोलकाता : उड्डाण सायं. ५.२५; आगमन रात्री ११
नाशिक-अहमदाबाद-वाराणशी : उड्डाण स.११.०५; आगमन सायं. ४.५५