Chhagan Bhujbal Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : येवल्यासाठी छगन भुजबळांनी दिली गुड न्यूज! 'या' कामांसाठी तब्बल 10 कोटींचा...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : येवला तालुक्यातील सिंचनाच्या १० कोटी २७ लाख रुपयांच्या १२ गेटेड सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामाची लवकरच सुरवात होऊन येवला तालुक्याच्या सिंचन क्षमतेत वाढ होणार आहे. येवल्याचे आमदार व राज्याचे अन्न नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र जलसंधारण मंडळाने ही कामे मंजूर केली आहेत.

येवला तालुक्यातील शून्य ते शंभर हेक्टर सिंचन क्षमतेच्या एकूण १२ गेटेड सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यासाठी एकूण १० कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव मंत्री भुजबळ यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून पाठवण्यात आला होता. त्यानुसार जलसंधारण महामंडळाने सर्व १२ सिमेंट काँक्रिट बंधारे मंजूर केले आहेत. त्यात येवला तालुक्यातील सोमठाण जोश १३ गेटेड सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यासाठी ६९ लाख ७ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच सोमठाण जोश क्रमांक १४ गेटेड सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यासाठी ६८ लाख २० हजार, ममदापूर क्रमांक १६ गेटेड सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यासाठी १ कोटी १९ लाख ८४ हजार, देवदरी क्रमांक ४ गेटेड सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यासाठी ७७ लाख २८ हजार, देवदरी क्रमांक ५ गेटेड सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यासाठी ८४ लाख २८ हजार निधी मंजूर करण्यात आला आहे.
     

त्याचबरोबर देवदरी क्रमांक ६ गेटेड सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यासाठी ७७ लाख ३७ हजार, सोमठाण जोश क्रमांक १० गेटेड सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यासाठी ६८ लाख ४८ हजार, सोमठाण जोश क्रमांक ११ गेटेड सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यासाठी ७७ लाख ८१ हजार, रहाडी क्रमांक १३ गेटेड सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यासाठी १ कोटी १ लाख ६८ हजार, रहाडी क्रमांक १४ गेटेड सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यासाठी १ कोटी ११ लाख ६९ हजार, चांदगाव क्रमांक ३  गेटेड सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यासाठी ७६ लाख ४८ हजार, चांदगाव क्र.४  गेटेड सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यासाठी ९६ लाख १५ हजार निधी मंजूर करण्यात आला आहे. या जलसंधारणाच्या विकासकामांमुळे येवला तालुक्यातील सिंचन क्षेत्रात अधिक वाढ होणार आहे.