उत्तर महाराष्ट्र

चणकापूर आश्रमशाळा बांधण्यासाठी निघणार ‘टेंडर'

टेंडरनामा ब्युरो

नाशिक रोड : चणकापूर (ता. कळवण, जि. नाशिक) येथील धरणाजवळ आश्रमशाळा बांधकामाचे टेंडर निघणार असल्याची माहिती केंद्रीय लोकनिर्माण भवनातील अधिकाऱ्यांनी दिली.

मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रत्येक बालकाला आहे. हे शिक्षण घेण्यासाठी उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकार केजी टू पीजी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देत आहे. त्यातंर्गत गांधीनगर येथील केंद्रीय लोक निर्माण भवन येथील बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या विभागातर्फे आश्रमशाळा बांधण्यासाठी टेंडर निघणार आहे. वर्गखोल्या, शिक्षक खोल्या, मुले व मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था, त्याचप्रमाणे शिक्षक व शिक्षिकांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था तेथे असेल. शिक्षक व विद्यार्थ्यांना राहण्यासाठी खोल्यांची उभारणी करण्यात येणार आहे. स्वयंपाकगृह, भांडी घासण्याची व्यवस्था असेल. अभ्यास गटांसाठी स्वागत कक्ष, मुख्याध्यापक खोली, अधीक्षक खोली अशी रचना असणार आहे. शिवाय आश्रमशाळेला संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. ठराविक मुदतीत हे बांधकाम पूर्ण करून द्यायचे आहे. त्यासाठी टेंडर भरतांना अनामत रक्कम ठेकेदारांना जमा करावी लागणार आहे. या सर्व कामांसाठी टेंडर काढण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून येणाऱ्या काही दिवसातच ई-टेंडर प्रसिद्ध होणार आहे.