Nagpur Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांतून सिन्नर मतदारसंघाला 131 कोटी

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांमध्ये सिन्नर विधानसभा मतदारसंघातील रस्ते ,पूल व इमारतींसाठी १३१ कोटी रुपये निधीचा समावेश आहे. यामुळे सिन्नर मतदारसंघातील ४३ रस्त्यांचे भाग्य उजळणार असून आदिवासी भागातीलही इतर कामे होणार आहेत.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अर्थविभागाने सादर केलेल्या ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात सिन्नर तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या निमगाव सिन्नर ते कोळपेवाडी या रस्त्याच्या शिंदेवाडी ते शहा हद्द या सुमारे ८ किमी रस्त्याचे रुंदीकरण व कॉंक्रीटीकरण कामासाठी १२ कोटी रुपये, प्रमुख राज्यमार्ग १२ डुबेरे- पाडळी- समशेरपूर या रस्त्याच्या पहिल्या ८ किमी रस्त्याच्या सुधारणेसाठी ८ कोटी रुपये, प्रमुख जिल्हा मार्ग क्र.३० डुबेरे ते फर्दापूर सोमठाणे सांगवी ते इतर जिल्हा मार्ग ३२ व प्रमुख जिल्हा मार्ग १११ च्या ३६ ते ४३ किलोमीटरसाठी ५ कोटी रुपये  व २७ ते ३३ किमी च्या सुधारणेसाठी १० कोटी रुपये,सिन्नर जायगाव-नायगाव प्रमुख जिल्हा मार्ग किलोमीटर ५ ते १३ च्या रुंदीकरण व सुधारणेसाठी १० कोटी रुपये, दोडी खुर्द ते रामोशी वाडी पाटोळे या २.५ किलोमीटर रस्त्याची सुधारणा करणे १.५ कोटी, राष्ट्रीय महामार्ग ते दोडी खुर्द रस्त्याची सुधारणा करणे यासाठी १.५ कोटी असे ४८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणार आहेत.

आदिवासी भागातील कामांसाठीही निधी
सिन्नर विधानसभा मतदारसंघाच्या पश्चिम भागात आदिवासी लोकवस्ती आहे. तसेच या विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या इगतपुरी तालुक्यातील टाकेद गटातही आदिवासींचे प्रमाण अधिक आहे. यामुळे आगामी निवडणुका लक्षात घेऊन आमदार कोकाटे यांनी खेड गटातील कामांसाठीही मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.  यात रस्त्यांसाठी ३५ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यात धोंडबार ते जिल्हा हद्द रस्ता सुधारणा करणे ३ कोटी रुपये, टाकेद ते म्हैसवळण घाट रस्ता सुधारणा करणे ५ कोटी रुपये, शिवडे ते भैरवनाथ मंदिर रस्ता  सुधारणा करणे १ कोटी रुपये ,औंढे ते औंढेवाडी फाटा ते धोंडबार रस्ता सुधारणा करणे २ कोटी रुपये ,शुक्लतीर्थ ते खेड भरवस रस्ता सुधारणा करणे ३ कोटी रुपये, खेड ते भैरवनाथ मंदिर ठाकूरवाडी रस्ता सुधारणा करणे २.५ कोटी रुपये, कोनांबे ते डाळेवस्ती ते खापराळे रस्ता सुधारणा करणे १.५ कोटी रुपये, भांगरेवाडी ते बोकळेवाडी सोनोशी रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, वासाळी ते काचरवाडी वाघ्याची वाडी रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, अडसरे खुर्द ते भंडारदरवाडी रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, वासाळी ते राहुलनगर  रस्ता सुधारणा करणे १कोटी रपये, धाडोशी रस्ता सुधारणा करणे १कोटी रुपये, धोंडबार ते आवारे वस्ती  रस्ता सुधारणा करणे ७० लाख रुपये, घोरवड ते घोडेवाडी रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, घुटेवाडी ते रताळवाडी रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, घुटेवाडी ते रताळवाडी रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, ठाणगाव सरकारी दवाखाना ते डगळे वस्ती रस्ता सुधारणा करणे १.५ कोटी रुपये, राहुलनगर ते भोईरवस्ती रस्ता सुधारणा करणे ५० लाख रुपये, धामणी ते बेलगाव फाटा रस्ता सुधारणा करणे ५० लाख रुपये, भरवीर बुद्रूक ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा करणे ५० लाख रुपये , पिंपळगाव मोर ते झोपडपट्टी भंडारदरा  रस्ता सुधारणा करणे ५० लाख रुपये, धोंडबार  ते पाचपट्टा  रस्ता सुधारणा करणे १.५ कोटी रुपये, कमळदरवाडी ते आडवाडी रस्ता सुधारणा करणे २५ लाख रुपये, जांभूळवाडी  ते सोनेवाडी  रस्ता सुधारणा करणे ५० लाख रुपये, वाघदरवाडी  ते हिवरे  रस्ता सुधारणा करणे २ कोटी रुपये, निनावी ते कडवाधरण स्मशानभूमी रस्ता सुधारणा करणे १ कोटी रुपये, वासळी ते गावठा  रस्ता ३कोटी, खेड ते इंदोरे रस्ता १ कोटी २० लाख रुपये, इंदोरे ते माळवाडी १ कोटी २० लाख रुपये, टाकेद खुर्द ते तातळेवाडी रस्ता १ कोटी २० लाख रुपये, निनावी ते महादेववाडी गिरेवाडी १ कोटी २० लाख रुपये, निनावी ते बाजारवाट भरवीर रस्ता १ कोटी २० लाख रुपये, कवडदरा ते घोटी खुर्द रस्ता १ कोटी २० लाख रुपये, शेनवड ते खडकवाडी १ कोटी २० लाख रुपये, बेलगाव तऱ्हाळे ते गांगडवाडी १ कोटी १० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.