Highspeed Railway Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे; सिन्नरमधील जमिनींचे पुन्हा मूल्यांकन

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक-पुणे (Nashik-Pune) सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या सिन्नर तालुक्यातील काही गावांमध्ये तिसऱ्यांदा क्षेत्र बदल झाला आहे. त्यामुळे गतिमान असलेली भूसंपादन प्रक्रिया पुन्हा फेरमूल्यांकनापासून सुरू झाली आहे. सिन्नर तालुक्यातील १७ गावांपैकी साधारण चौदा गावातील या प्रश्नामुळे क्षेत्र बदललेल्या चौदा गावात फेरमूल्यांकनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी काही दिवसापूर्वी क्षेत्रात बदल सुचवले गेले आहेत. त्यामुळे आधीपासून गतिमान असलेली भूसंपादनाची प्रक्रिया मंदावली आहे. त्यातच अद्याप केंद्र सरकारने या प्रकल्पास मंजुरी दिली नसल्याने या हायस्पीड रेल्वेमार्गाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच महारेलने या रेल्वेमार्गात किंचितसा बदल केला आहे. यामुळे सिन्नर तालुक्यातील गावांमधील रेल्वे मार्गांचे क्षेत्र बदलले आहे. यामुळे या बदललेल्या क्षेत्राचे भूसपंदनाची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन क्षेत्र बदल झालेल्या सिन्नर तालुक्यातील १७ पैकी १४ फेरमूल्यांकनासाठी जमिनीच्या अंतिम दरासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातील एका गावाच्या जमिनीच्या दरावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून लवकरच इतर गावात जमिनीचे मूल्यांकन जाहीर होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांनी सांगितले, पहिल्या टप्प्यात सिन्नर तालुक्यातील आठवड्याभरात या प्रक्रियेस प्रारंभ करण्यात येणार आहे. पावणेदोन तासांत नाशिकहून पेट पुण्याला पोचवणाऱ्या या नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आली. कालांतराने त्यात बदल झाला. जिल्हाधिकारी गंगाधरन डी. यांच्या उपस्थितीत मूल्यांकन फेरप्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात जिरायती जमिनीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मागील तीन वर्षांत झालेल्या खरेदी विक्रीचा व्यवहार विचारात घेऊन सर्वाधिक नोंद झालेल्या व्यवहारांची तुलना करून दर निश्चित करत येतात. मात्र, नेमके हे दर किती असतील याबाबत अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले नसून या दराबाबत उत्सुकता आहे.

असा आहे प्रकल्प
-
२३५ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग
- रेल्वेचा २०० किलोमीटर प्रतितास वेग
- पुढे हा वेग २५० कि. मी. पर्यंत वाडविणार
- पुणे-नाशिक अंतर अवया पाऊणे दोन तासात कापणार
- इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पुरक प्रकल्प
- पुणे-नाशिक दरम्यान २४ स्थानकांची आखणी
- १८ बोगदे, ४१ उड्डाणपूल १२८ भुयारी मार्ग प्रस्तावित

सिन्नर तालुक्यातील १७ पैकी १४ फेरमूल्यांकनासाठी जमिनीच्या अंतिम दरासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातील एका गावाच्या जमिनीच्या दरावर. शिक्कामोर्तब करण्यात आले असून जिल्हाधिकारी गंगाचरन डी. यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच इतर गावात जमिनीचे मूल्यांकन जाहीर होईल.
- वासंती माळी, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन, नाशिक