नाशिक (Nashik) : सामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी रेशन दुकानात शंभर रूपयात आनंदाचा शिधा वाटपाचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. दिवाळी सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधी रेश दुकानांमधून हा आनंदाचा शिधा लाभार्थ्याना मिळण्यास सुरवात झाली असल, तर ग्रामीण व दुर्गम भागात ईपॉस मशिनला इंटरनेटचे संपर्क क्षेत्र मिळत नसल्यामुळे या शिधा वाटपात अडथळा येत आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतू दोन वर्षांपासून बहुतांश नागरिकांना अन्नधान्य मोफत व कमी दरामध्ये रेशन दुकानांमध्ये उपलबध करून दिले जात आहे. त्यातच राज्य सरकारने गरीबांची दिवाळी आनंदाची जावी यासाठी १०० रुपयांमध्ये खादयतेल, रवा, चनदाळ व साखर या चार वस्तू रेशनदुकानात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.सरकारने य योजनेला आनंदाचा शिधा असे नाव दिले आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रिय राबवण्यात आली. या टेंडरबाबत विरोधकांनी संशय व्यक्त केल्यानंतरही ती प्रक्रिया पूर्ण होऊन दोन दिवसांपूर्वी तो शिधा रेशन दुकानदारांपर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर शिधा वाटपात सुरळीतपणा आला आहे.
मागणीच्या तुलनेत ८० टक्के किट प्राप्त झाल्याने सर्व तालुक्यांना शिधा पोहचलेला आहे. शहरात वितरण सुरू झाले. सध्या ग्रामीण भागाला पुरवठा खात्याने प्राधान्य दिले आहे. रेशन दुकानातनात गहु, तांदुळ व साखरे शिवाय फारसे काही मिळत नव्हते. यंदा राज्य सरकारच्या पुढाकारातून दिवाळीत चार वस्तू मिळणार असल्यामुळे या योजनेला लाभार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, जिल्ह्याच्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, सुरगाणा या तालुक्यांच्या दुर्गम भागात इंटरनेटच्य संपर्कक्षेत्राची अडचण येत आहे. शिधा वाटपाची नोंद ई पॉस मशिनवर करणे आवश्यक असल्याने इंटरनेटच्या संपर्क क्षेत्राअभावी शिधा वाटपात अडथळे येत आहेत. दिवाळीत शंभर रुपयात ४ वस्तु मिळत असून त्यामुळे यंदाची दिवाळी तशी गोड झाली आहे.