Devendra Fadnavis Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis : नार-पार योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांनी काय केली मोठी घोषणा?

टेंडरनामा ब्युरो

जळगाव (Jalgaon) : जळगाव जिल्ह्यासह खानदेश सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नार-पार गिरणा सिंचन योजनेला (Nar Par Girna Irrigation Project) आपण गती दिली. केंद्र सरकारनेही त्यास मंजुरी दिली असून राज्य या प्रकल्पाच्या टेंडर (Tender) प्रक्रियेस राज्य मंत्रिमंडळात मान्यता देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

राज्यात बचत गटांमार्फत ७५ लाख कुटुंबे जोडली असून, दोन कोटी कुटुंब जोडण्याचा संकल्प केल्याचे ते म्हणाले. महिला विकासाच्या प्रवाहात आल्यास देशात प्रभावी आणि विकासात्मक बदल घडू शकतो. त्यामुळेच विकासाच्या प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान असणाऱ्या नारी शक्तीच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्य शासन सर्वतोपरी साहाय्य करत असल्याचे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.

‘लखपती दीदीं’चा पंतप्रधानांकडून सन्मान

जळगावात झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील वंदना पाटील, मनीषा जगताप, ज्योती तागडे, सीमा कांबळे, रमा ठाकूर यांच्यासह शीतल नारेट (हिमाचल प्रदेश), मेहबूबा अख्तर (जम्मू काश्मीर), गंगा अहिरवार (मध्य प्रदेश), एस. कृष्णावेण्णी (तेलंगण) आणि नीरज देवी (उत्तर प्रदेश), सेरिंग डोलकर (लडाख) यांना यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखपती दीदी झाल्याबद्दल सन्मानपत्र देण्यात आले. मोदी यांच्या हस्ते बचत गटाच्या ४८ लाख महिलांना २,५०० कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण करण्यात आले.

क्षणचित्रे

- राज्यभरातून हजारो महिला जळगावात

- सकाळपासूनच कुसुंबा रस्त्यावर गर्दी

- संमेलनास महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद

- संमेलनात गर्दीचा विक्रम मोडल्याचा दावा

- महाजन म्हणतात.. दीड लाख महिला आल्या

- पोलिसांचा आकडा ७५ हजारांचा