Narendra Modi Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी काळाराम मंदिराच्या नुतनीकरणासाठी 1.82 कोटी मंजूर

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरात श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तत्पूर्वी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. श्रीराम पंचवटीत वनवासाच्या काळात राहिलेले असल्याने येथील श्री काळाराम मंदिराचे महत्व मोठे असून येथे देशभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. काळाराम मंदिर पेशवेकालीन असून या मंदिराच्या ओवर्यांची दुरवस्था जाली असून मंदिरात पावसाचे पाणी झिरपत असते. यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी जिल्हा नियोजन समितीतून या ओवर्यांच्या व मंदिराच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १.८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने १२ जानेवारीस नाशिक दौर्यावर येत आहेत. युवा महोत्सवाच्या निमित्ताने नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता, सुशोभीकरणावर भर दिला जात असून नाशिक शहर उजळून निघाले आहे. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री काळाराम मंदिरात महापूजा करणार आहेत. यामुळे श्री काळाराम मंदिराचेही नुतनीकरण व सुशोभिकरण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विशेष बाब म्हणून काळाराम मंदिर परिसर सुशोभिकरण आणि मंदिर प्रांगणातील ओवर्यांचे नुतनीकरणासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या पर्यटन लेखाशीर्षातून १ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता मंदिराच्या विकासाच्या रखडलेला वनवासही संपला आहे.

श्री काळाराम मंदिर पेशवेकाळात बांधलेले असून या मंदिराचे प्रत्येक सिहस्थ कुंभमेळा काळात पुरातत्व विभागाकडून नुतनीकरण केले जाते. नागर शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या श्री काळाराम मंदिरात गेल्या तीन-चार वर्षांपासून पावसाचे पाणी झिरपू लागले आहेत. मंदिराच्या बांधकामाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. त्यावर उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. काही ठिकाणी झिरपलेल्या पावसाच्या पाण्याने बांधकामावर पांढरा थर साचतो. त्यामुळे येथील ओवरयांचे नुतनीकरण करण्याची मागणी होत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचवटीतील काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत. त्याचप्रमाणे शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २२ जानेवारी रोजी काळाराम मंदिरात महाआरती करणार आहेत. श्रीराम जन्मभूमीचा ५०० वर्षांचा वनवास संपणार असून तेथे भव्य मंदिर उभारले जात असाताना पंचवटीतील काळाराम मंदिराच्या रखडलेल्या विकासकामांचा वनवासही या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंदिराच्या ओसरी नुतनीकरण व दुरुस्तीसाठी १ कोटी ८२ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.