Nashik

 

Tendernama

उत्तर महाराष्ट्र

नाशिकसाठी मोठी बातमी; नाशिक रोडला ४० मजल्यांचे ट्रान्सर्पोट हब

टेंडरनामा ब्युरो

नाशिक : महारेल, मेट्रो, मध्य रेल्वे आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक रोड स्थानकावर ४० मजल्यांचे मजल्यांचे उंच मल्टी मॉडेल ट्रान्सर्पोट हब होणार आहे. महारेलने महारेलने इच्छुक कंत्राटदारांकडून लेटर ऑफ इंटरेस्ट मागविण्याची प्रक्रिया सुरू केले आहे.

नाशिक रोड परिसर हा शहराच्या कनेक्टिव्हिटीचा कणा आहे. रेल्वेस्थानक पुणे महामार्गासह नाशिक सिटी बससेवेचे प्रमुख केंद्र आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचे स्थानक याच भागात आहे. अशातच या भागात महापालिकेतर्फे टायरबेस मेट्रो प्रकल्प आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यात केंद्र शासन व राज्य सरकारच्या एकत्रित सहभागातून नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग सुरु होत आहे.

महारेल, मेट्रो, रेल्वे आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक रोड रेल्वेस्टेशनवर सुमारे पन्नास मजले उंचीचे मल्टी मॉडेल हब उभारण्यात येणार असून प्रवाशांना एकाच छताखाली सर्व प्रकारच्या सोयी - सुविधा होणार आहेत. पहिल्या मजल्यावर हायस्पीड नाशिक - पुणे रेल्वेलाईन तर दुसऱ्या मजल्यावर मेट्रो निओ असणार आहे. मल्टी मॉडेल हबचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी महारेलने इच्छुक कंत्राटदारांकडून लेटर ऑफ इंटरेस्ट मागविण्याची प्रक्रिया सुरू केले आहे.

नाशिक रोडला येथील रेल्वेस्थानकाचे रूपडे आता पूर्णपणे पालटले जाणार असून आता या रेल्वेस्थानकाला कार्पोरेट लूक मिळणार आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकाला येत्या काही महिण्यात महिन्यांत आंतरराष्ट्रीय दर्जाची झळाळी प्राप्त होणार आहे.

नाशिक रोडला राज्य मार्ग परिवहन सेवा, महापालिकेची स्मार्ट सिटी सेवा, नव्याने होणारी टायरबेस सेवा, मध्य रेल्वेचे बसस्थानक आणि नव्याने होउ घातलेल्या नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचे केंद्र या भागातून एकाच भागातून जात असल्याने सगळ्या सेवांची स्थानक एकाच इमारतीत करण्याचा ट्रान्सर्पोट मल्टी हब प्रस्तावासाठी टेंडर मागविले आहेत.

- हेमंत गोडसे (खासदार नाशिक)