Chandani Chowk Tendernama
पुणे

Pune: चांदणी चौकातील काम 15 जुलैपर्यंत पूर्ण होणार का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : चांदणी चौक (Chandani Chowk) येथील एनडीए व बावधनला जोडणाऱ्या पुलाचे काम वेगात सुरू आहे. यासाठी २२ खांब उभारण्यात आले असून, आता त्यावर बीम टाकण्याचे काम सुरू आहे. ते १० दिवसांत संपेल. मग बीमवर गर्डर टाकले जातील. या महत्त्वाच्या रस्त्याच्या प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. १५ जुलैच्या आत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चांदणी चौक येथील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सुमारे ३९७ कोटी रुपये खर्चून १७ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार केले. यात रॅम्प, सेवा रस्ता, अंडरपास यांचा समावेश आहे. आता केवळ पुलाचे काम शिल्लक आहे.

असा आहे नवा पूल

१५० मीटर ः लांबी

३२ मीटर ः रुंदी

आधीचा पूल

५० मीटर ः लांबी

२० मीटर ः रुंदी

वैशिष्ट्ये

- जुन्या पुलाचे खांब रस्त्याच्या मधोमध होते, परिणामी वाहतुकीत

- नव्या पुलाचे खांब रस्त्याच्या मधोमध नव्हे तर दोन्ही बाजूला

- बावधनच्या बाजूला ८ खांब

- एनडीएच्या बाजूला १४ खांब

पुलासोबतच सेवारस्त्यासाठी गर्डर

- एकूण ९३ गर्डरचा वापर

- पुलासोबतच सेवा रस्ता व मुख्य रस्त्यासाठीही गर्डर

- ही कामे एकाच वेळी सुरु होणार

- मुख्य रस्त्यासाठी ९, सेवा रस्त्यासाठी ३३ गर्डर

- या कामासाठी किमान २० दिवसांचा अवधी

हे काम पूर्ण

१. कोथरूडहुन मुळशीकडे जाणारा अंडरपास सोमवार पासून सुरु झाला असून तो ८५० मीटरचा आहे. यातील २६० मीटर मार्ग अच्छादित (कव्हर्ड)

२. बावधन- पाषाण मार्गे वारजे, कात्रजला जाणारा रॅम्प क्रमांक ६ सुरू

३. मुळशीमार्गे मुंबईला जाणारा रॅम्प क्रमांक २ सुरू

४. मुळशीहुन कोथरूड, साताऱ्याकडे जाणारा रॅम्प १ सुद्धा सुरू

५. कोथरूडहुन बावधनला जाणाऱ्या रॅम्प क्रमांक ७ चे काम ९० टक्के पूर्ण, तयार रस्त्यावरून वाहतूक सुरू

६. वेदविहारहुन एनडीए कडे जाणारा रस्ता पूर्ण

७. कोथरूडमार्गे मुंबईला जाणाऱ्या सेवा रस्त्यावरून वाहतूक सुरू

चांदणी चौक रस्ते प्रकल्पातील सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. १० दिवसांत गर्डर टाकण्याचे काम सुरू होईल. यावेळी वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होईल असे नियोजन करीत आहोत. मुख्य रस्त्यावर गर्डर टाकताना दोन्ही सेवा रस्त्यांवरून वाहतूक सुरू राहील.

- संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे