Pune Road Tendernama
पुणे

Pune : पुण्यातील 'या' प्रसिद्ध रस्त्यावर का मंदावला वाहतुकीचा वेग?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : लक्ष्मी रस्त्यावर क्वार्टर गेट चौक ते सोन्या मारुती चौक दरम्यान महापालिकेने (PMC) जलवाहिनी टाकण्याचे काम दोन महिन्यांपूर्वी केले. त्यासाठी रस्‍त्यावर खोदाई करण्यात आली होती.

काम पूर्ण झाल्यावर त्यावर काँक्रिट टाकून सपाटीकरण करण्यात आले. परंतु, आता डांबरी रस्ता आणि सपाटीकरण यामध्ये भेगा पडल्या आहेत. त्यामुळे खड्डे निर्माण झाले आहेत. फडके हौद चौकापर्यंतच्या रस्त्यांवर खड्डे झाले आहेत.

अशी आहे स्थिती

- शिवशक्ती चौक (चाचा हलवाई चौक) येथेही दुतर्फा खड्डे

- डुल्या मारुती चौकातही खड्डे पडल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी

- फिश आळी समोरील रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने तेथे अस्वच्छता. साचलेल्या पाण्यातच खड्डेही

- डुल्या मारुती चौकात मोठे खड्डे. महापालिकेने खड्डे दुरुस्तीचे काम केले. परंतु, त्यातील खडी आता बाहेर आली आहे

- हमजेखान चौक, सतरंजीवाला चौक, तांबोळी मशीद चौक, सोन्या मारुती चौक येथेही खड्डे आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे काम कुचकामी झाल्याने या भागांत वाहतुकीचा वेग मंदावतो, वारंवार वाहतुकीची कोंडी

- सोन्या मारुती चौक ते बेलबाग चौक आणि टिळक चौक दरम्यानच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. मात्र, क्वार्टर गेट चौक ते बेलबाग चौक दरम्यान रस्त्याची दुरवस्था