Lounge Tendernama
पुणे

Pune Railway Station : पुणे रेल्वे स्थानकावर मिळणार एअरपोर्टचा फील; लवकरच सुरू होतोय...

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : विमानतळाच्या धर्तीवर पुणे रेल्वे स्थानकावर (Pune Railway Station) आता प्रवाशांसाठी चांगल्या दर्जाचा आलिशान लाउंज (Lounge) बांधण्यात येणार आहे. आरक्षण केंद्राच्या जागेत हा लाउंज बांधण्यात येणार आहे. यात प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळतील. लवकरच याच्या टेंडर (Tender) प्रक्रियेला सुरवात होणार आहे. (Airport Like Lounge At Pune Railway Station Soon News)

पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवाशांना बसण्यासाठी फलाट क्रमांक एक वर प्रतीक्षालय आहे. पण ते सामान्य दर्जाचे आहे. तर पार्सल कार्यालयाच्या बाजूला देखील एक वातानुकूलित प्रतीक्षालय आहे. त्यात कोणत्याही अतिरिक्त सुविधा नाहीत. शिवाय बसण्याची व्यवस्था देखील साधारणच आहे.

पुणे स्थानकावर नेहमीच ‘व्हीआयपी’ व्यक्तींचे येणे-जाणे असते. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सर्व सुविधांनी सुसज्ज असे लाउंज बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळतील.

या मिळतील सुविधा...

- आरामदायक सोफा

- चहा, कॉफी, नाश्त्याचे पदार्थ (याचे दर स्वतंत्र असतील)

- फ्री वायफाय

- पुस्तके, मासिक, वृत्तपत्रे

- वातानुकूलित यंत्रणा

- स्वच्छ स्वच्छतागृह

प्रवाशांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी पुणे स्थानकावर ‘लाउंज’ सुरू केले जाईल. लवकरच याच्या टेंडर प्रक्रियेला सुरवात होईल. हे लाउंज विमानतळाच्या धर्तीवर बांधले जाईल.

- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे