ST Bus Stand - MSRTC Tendernama
पुणे

Pune: पुणे - कोल्हापूर प्रवास आता होणार आणखी आरामदाई; कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मुंबई (Mumbai) मार्गावरील आठ वर्षांपेक्षा जास्त जुन्या शिवनेरी (Shivneri) गाड्यांची सेवा शनिवारपासून कोल्हापूर मार्गावर सुरू झाली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) या गाड्यांना जन शिवनेरी (Jan Shivneri) असे नाव दिले आहे.

पुण्याहून नाशिकसाठी या गाड्यांची सेवा सुरू आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याने कोल्हापूरसाठी सेवा सुरू करण्यात आली. पुणे आणि कोल्हापूर या विभागांना प्रत्येकी चार गाड्या मिळाल्या आहेत. यातून दिवसभरात आठ फेऱ्या होतील.

पुणे - कोल्हापूर शिवशाहीला (Shivshahi) प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो. आता प्रवाशांना जन शिवनेरीचाही पर्याय आहे. शिवनेरी ही महामंडळाच्या ताफ्यातील सर्वात आरामदायक बस मानली जाते. शिवनेरीच्या तुलनेत जन शिवनेरीचा तिकीट दर माफक ठेवण्यात आला आहे.

नाशिकसाठी १८ फेऱ्या
पुणे-नाशिक मार्गावर १० जुलै पासून प्रायोगिक तत्त्वावर जन शिवनेरी विनावाहक सेवा सुरू झाली. माफक तिकीटदरामुळे यास चांगला प्रतिसाद मिळतो. या मार्गावर दिवसभरात १८ फेऱ्या होत आहेत.

या आहेत वेळा...
स्वारगेट ते कोल्हापूर : सकाळी ५.४५, ६.४५, ७.४५ व ८.४५
कोल्हापूर ते स्वारगेट : दुपारी ११.४५, १२.४५, १.४५ व २.४५

तिकीट दर :
जन शिवनेरी : ५२५ (प्रति प्रवासी )
शिवशाही : ५०० (प्रति प्रवासी )

पुणे-कोल्हापूर जन शिवनेरी बस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात येईल. अन्य मार्गांवरही ही सेवा सुरू करण्याचा विचार आहे.
- कैलास पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी विभाग, पुणे