PMP Tendernama
पुणे

Pune : नव्या वर्षात पीएमपी देणार गुड न्यूज! असा आहे प्लॅन...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पीएमपी (PMPML) दोन आगारांचा विकास करून त्या जागेचा व्यावसायिक वापर करणार आहे. उत्पन्न वाढीसाठी आगारे निश्चित करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात निगडी आणि सुतारवाडी या दोन आगारांचा समावेश आहे. यासाठीची टेंडर (Tender) प्रक्रिया सुरू झाली आहे. ती येत्या जानेवारी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

मोक्याच्या ठिकाणी असलेल्या आगारांच्या जागेत कार्यालये, दुकाने, वाहनतळ आदी सुविधा करण्यात येतील. ही आगारे ३० वर्षांच्या कालावधीसाठी विकसित केली जातील. या कालावधीत एका आगारातून एका वर्षाला एक कोटी याप्रमाणे पीएमपीला सुमारे ३० कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे. पीएमपीची आगारे आकाराने मोठी आहेत. ती शहरातील मोक्याच्या जागी असल्याने जागेला खूप मागणी आहे. पीएमपी आपली जागा भाडेतत्त्वावर वापरण्यास देणार आहे.

या विषयी पीएमपीएमएल, पुणेचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी सांगितले की, ‘आर्थिकदृष्टया सक्षम बनण्याच्या उद्देशाने पीएमपीच्या आगारांचा व्यावसायिक कारणांसाठी वापर केला जाणार आहे. बीओटी तत्त्वावर आगारांचा विकास केला जाईल.’