PMC Pune Tendernama
पुणे

Pune : वीजदरवाढ झाल्यास पालिकेला भरावे लागेल 300 कोटींचे बिल

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : वीज दरात (Power Charges) ३७ टक्क्यांची वाढ होणार असल्याने महापालिकेलाही (PMC) त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रस्तावित केलेल्या दरानुसार वाढ केली तर वर्षाला किमान ९० कोटी रुपये वीज बिलाचा (Light Bill) खर्च वाढणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या पुणे महापालिका वीजबिलापोटी दरवर्षी २१० कोटी रुपये खर्च होतात. मात्र नवीन वाढ लागू झाल्यास तो ३०० कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिकेचे मैलापाणी शुद्धीकरण केंद्र, जल शुद्धीकरण केंद्र, पथदिवे, सर्व कार्यालये, महापालिकेच्या शाळा, उद्याने, नाट्यगृहे, संग्रहालय, पार्किंग, क्रीडांगण, कचरा प्रकल्प, बायोगॅस प्लांट, हॉट मिक्स प्लांट, स्मशानभूमी यासह अन्य ठिकाणी विजेचा वापर केला जातो. महावितरणतर्फे नाट्यगृह व इतर व्यावसायिक वापराच्या इमारतींना प्रतियुनिट १३ रुपये वीज बिल आकारले जाते, तर इतर ठिकाणी ७.५० रुपये वीज आकार आहे.