Potholes (File) Tendernama
पुणे

Pune : बापरे! हडपसर उड्डाणपुलावरच सलग 25 मीटरवर खोल खड्डा?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असलेल्या हडपसर-स्वारगेट मार्गावर (Hadapsar Swargate Road) नुकत्याच झालेल्या पावसाने ठिकठिकाणी खड्डे (Potholes) पडले आहेत. हडपसर उड्डाणपुलावर सलग २५ मीटरचा खोल खड्डा पडला असून, हा खड्डा लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

आदर पूनावाला क्लीन सिटीच्या माध्यमातून खड्डे बुजविण्याचे काही काम वगळता महापालिकेकडून मात्र या कामाला अजून मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे प्रवाशांना या मार्गावर सध्या मोठी कसरत करावी लागत आहे.

हडपसर उड्डाणपूल, मगरपट्टा चौक, किर्लोस्कर उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचे पायथे, काळुबाई मंदिर चौक, पुलगेट ते गोळीबार मैदान रस्ता, धोबी घाट, मीरा सोसायटी, सेवन लव्ह चौक, एकबोटे कॉलनी या परिसरातील रस्त्याची चाळण झाली आहे.

शंकर शेठ रोडवरील कुमार पॅसिफिक वर्ल्ड व मोलिदिनी स्कूलसमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचून खड्डे पडले आहेत. पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यांची वारंवार दुरवस्था होत आहे. वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने सोसायटीत जाणे येणे त्रासदायक ठरत आहे.

- सागर मुनोत, वालचंद ओसवाल, नागरिक

अशी आहे परिस्थिती...

• हडपसर उड्डाणपुलावर सलग २५ मीटरचा खोल खड्डा

• खड्डा लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका

• पुलगेट ते गोळीबार मैदान सलग खड्ड्यांमुळे वाहतूक संथ

• संरक्षण खात्याच्या हद्दीतील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात खड्डे

• महापालिकेकडून रात्री काम केले जात असल्याचा दावा मात्र, झालेले काम दिसेना

• काही ठिकाणी केलेल्या पॅचवर्कच्या कामामुळे उंचवटे निर्माण झाले असून तेही वाहतुकीला धोकादायक