Pune Tendernama
पुणे

Pune : Tender काढायला अधिकाऱ्यांकडून उशीर; नागरिकांच्या वाट्याला नाहक त्रास!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात प्रचंड प्रमाणात जलपर्णी वाढल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीसोबतच डासांचा प्रादुर्भाव सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेने (PMC) टेंडर प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

मुळा-मुठा नदीपात्रात मुंढवा पूल ते खराडी गावठाणापर्यंत मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढल्या आहेत. शिवाय प्रक्रिया न करताच नदीमध्ये जागोजागी सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे दुर्गंधी आणि जलपर्णींचे साम्राज्य पसरल्याचे स्थानिक रहिवासी अमोल शिंदे यांनी सांगितले.

माजी आमदार बापू पठारे म्हणाले, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये दरवर्षी हा त्रास होतो. हे लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी टेंडर प्रक्रियेची तयारी आधीपासूनच करून ठेवली पाहिजे. तहान लागल्यावर विहीर खोदण्याची अधिकाऱ्यांची पद्धत चुकीची आहे.

टेंडर प्रक्रिया सुरू असल्यामुळे जलपर्णी काढता येत नव्हती. जलपर्णी काढायला सुरवात केली असून, पाच-सहा दिवसांत काम पूर्ण होईल.

- मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, पुणे महापालिका