PMP Tendernama
पुणे

Pune News : पीएमपीएलच्या 'या' सेवेला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद; अवघ्या 2 महिन्यांत...

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : प्रवाशांना पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना कमी दरात भेटी देता यावे यासाठी ‘पीएमपी’ (PMP) प्रशासनाने मे २३ मध्ये पर्यटन बस सेवा सुरू केली.

ही सेवा सात मार्गांवर असून दर शनिवारी व रविवारी ही सेवा सुरू असते. प्रतिप्रवासी ५०० रुपये आकारले जातात. मे २३ ते जून २४ पर्यंत या बससेवेच्या माध्यमातून १३६७ जणांनी प्रवास केला. यातून ‘पीएमपी’ला सहा लाख ८३ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी व रविवारी विविध कार्यालये, कॉलेज, शाळा, औद्योगिक क्षेत्रातील व आयटी क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकरदारांना साप्ताहिक सुटी असल्याने या दिवशी प्रवाशांचा प्रतिसाद जास्त असतो.

प्रवाशांचा प्रवास आरामदायी, सुलभ व माफक दरात होण्याच्या दृष्टीने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे दर्शन बससेवेची सुरवात केली होती. यामध्ये पर्यटन स्थळांकरिता वातानुकूलित ई-बसद्वारे विशेष बससेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी या बस सुरू करण्यात आल्या आहे.

जून महिन्यात सर्वाधिक उत्पन्न

जून महिन्याच्या सुरवातीपासूनच पावसाची चाहूल लागल्याने पर्यटकांनीन ‘पीएमपी’ बससेवेचा वापर केला. तसेच साप्ताहिक सुट्या, सार्वजनिक सुट्या यासोबतच शाळेलाही सुट्या असल्याने जून महिन्यात ‘पीएमपी’च्या पर्यटन बससेवेला सर्वाधिक चांगला प्रतिसाद मिळाला.

जून २४ मध्ये ३१८ प्रवाशांनी प्रवास केला असून यातून सर्वाधिक म्हणजे एक लाख ५९ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

कोणत्या महिन्यात किती उत्पन्न (रुपयांमध्ये)

- मे २०२३ : ४०,५००

- जून २०२३ : १,०३,०००

- जुलै २०२३ : ६३,५००

- ऑगस्ट २०२३ : १,१०,५००

- सप्टेंबर २०२३: ४०,०००

- ऑक्टोबर २०२३ : २१,०००

- नोव्हेंबर २०२३ : १४,०००

- डिसेंबर २०२३ : ४२,५००

- जानेवारी २०२४ : २७,५००

- फेब्रुवारी २०२४ : २८,०००

- मे २०२४ : ३४,०००

- जून २०२४ : १,५९,०००