Pune Railway Station Tendernama
पुणे

Pune News : पुणे रेल्वे स्टेशनवरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी Good News

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील (CSMT) फलाट क्रमांक १० आणि ११ची लांबी वाढविण्यात येत आहे. सुमारे ७०० मीटर लांबीचा फलाट तयार करण्यात येत असल्याने या फलाटावर सुमारे २० डब्यांची रेल्वे थांबू शकणार आहे. याचा फायदा पुणेकरांना होणार आहे. पुण्याहून धावणाऱ्या ५ रेल्वेच्या डब्याच्या संख्येत वाढ होणार आहे. यात प्रगती, सिंहगडसह तीन रेल्वेचा समावेश आहे. (Pragati, Sinhgad Express Trains Update)

गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांनी प्रगती व सिंहगड एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी केली होती. मात्र मुंबईत त्या लांबीचे फलाट नसल्याने डबे वाढविण्यात अडचण येत होती. रेल्वे प्रशासनाने आता फलाटांची लांबी वाढविण्याचे काम हाती घेतल्याने डबे वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डब्यांची संख्या वाढल्याने प्रवाशांना याचा थेट फायदा मिळणार आहे. गाड्यांचे वेटिंग कमी होण्यास मदत होईल. वाढणारे डबे हे कोणत्या श्रेणीचे असणार आहेत, हे अद्याप ठरलेले नाहीत. मात्र ते आरक्षित असतील हे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या रेल्वेचे वाढणार डबे : किती वाढणार डबे

१. प्रगती एक्स्प्रेस १ (१५)

२. सिंहगड एक्स्प्रेस १ (१६)

३. गदग -मुंबई-गदग : गदग एक्स्प्रेस ३ (१६)

४. कोल्हापूर - मुंबई -कोल्हापूर : कोयना एक्स्प्रेस ३(१६)

५. चेन्नई - मुंबई- चेन्नई: चेन्नई एक्स्प्रेस ४ (१६)

(कंसात सध्या असलेल्या डब्यांची संख्या आहे.)

किती प्रवाशांना फायदा मिळणार

१. सेकंड सीटिंग : १०३

२. चेअर कार : ७५

३.थ्री टियर : ६४

४ . टू टियर : ४८

५. स्लीपर : ७२

(प्रत्येक डब्यांची प्रवासी क्षमता वेगळी आहे. डबा निश्चित झाल्यावर त्याच्या क्षमतेनुसार तेवढ्या प्रवाशांना फायदा होईल.)

फलाटाचे काम झाल्यावर डब्यांची संख्या वाढवली जाईल. कोणत्या श्रेणीचे डबे वाढवायचे हे अद्याप ठरलेले नाही. लवकरच या बाबत निर्णय होईल. प्रवाशांना मात्र याचा निश्‍चितच फायदा होईल.

- डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मुंबई