Pune Tendernama
पुणे

Pune News : बापरे! अवघ्या 9 दिवसांत पुण्यातील रस्त्यावर आल्या नव्या 4 हजार दुचाकी

टेंडरनामा ब्युरो

Pune News पुणे : अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ६ हजार २०४ नवीन वाहनांची खरेदी झाली आहे. यात सर्वात जास्त खरेदी दुचाकींची झाली आहे.

अवघ्या नऊ दिवसांत चार हजार २७० दुचाकीची नोंद झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत वाहनांची खरेदी यंदा कमी झाली. इलेक्ट्रिक वाहनांना देखील यंदा काहीसा कमी प्रतिसाद लाभलेला आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या मुहूर्ताला वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. काही जण जुन्या वाहनांची देखील खरेदी करतात. अनेकांना अक्षय्य तृतीयेच्या दिवशी वाहन घ्यायचे असल्याने अनेक जण आधीच वाहन बुक करून ठेवतात.

एक ते नऊ मे दरम्यान पुण्यात सहा हजार २०४ नवीन वाहनांची खरेदी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात वाहन खरेदीत घट झाली आहे.

मागच्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर १३ ते २२ एप्रिल दरम्यान ७ हजार ९०२ वाहनांची खरेदी झाली होती. त्यावेळी दुचाकीची संख्या ४ हजार ९१२ इतकी होती. यंदाच्या वर्षी ३९० इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी झाली आहे. मागच्या वर्षी ही संख्या ७१८ इतकी होती.