Street Dogs Tendernama
पुणे

Pune : महापालिकेने अडीच वर्षांत भटकी कुत्री आणि मांजरांना पकडण्यासाठी केला 20 कोटी खर्च

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : महापालिकेने अडीच वर्षांत भटकी कुत्री आणि मांजरांना पकडण्यासाठी २० कोटी रुपये खर्च केले आहेत. २०२३- २४ मध्ये सर्वाधिक ९ कोटी ३७ लाख ३३ हजारांचा निधी एकत्रित खर्च करण्यात आला आहे. या काळात जवळपास एक लाख कुत्र्यांची निर्बिजीकरण आणि सव्वालाख कुत्र्यांचे लसीकरण केल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी ही सर्व फसवाफसवी असल्याचा थेट आरोप नागरिक करत आहेत.

महापालिकेकडून लसीकरण आणि नसबंदी जरी मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी प्रत्यक्षात अशा कुत्र्यांचा आकडा कमी झालेला दिसत नाही. महापालिकेची फसलेली नसबंदी आणि लसीकरण यात नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून, कुत्र्यांकडून होत असलेल्या हल्ल्यांमध्ये कुठल्याही प्रकारची घट होताना दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मोकाट कुत्री, मांजरांसाठी केलेला खर्च

वर्ष खर्च

२०२२-२३ ५ कोटी ९५ लाख १०हजार ३७५

२०२३-२४ ९ कोटी ३७ लाख ३३ हजार १०४

एप्रिलपासून जुलै २०२४ ५ कोटी ५ लाख ४३ हजार ६६०