Pune Tendernama
पुणे

Pune : कात्रज-कोंढवा रस्त्याबाबत मोठे पाऊल; भूसंपादनाची केली...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी पाहणी केली. सध्या उपलब्ध असलेल्या रस्त्यावर वाहतूक सुधारणा व आवश्‍यक कामे सुरु आहेत.

नगर रस्ता, सोलापूर रस्ता, सासवड रस्ता या भागांतून कात्रज-कोंढवा मार्गे मुंबईच्या दिशेने अवजड वाहतूक सुरु आहे. अवजड वाहनांची वाहतूक या रस्त्यावर कायम असते. या पार्श्‍वभूमीवर संबंधित रस्ता तत्काळ व्हावा अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. सध्याचा तीन किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी काही वर्षांपूर्वी भूमिपूजनही झाले. रस्ता त्यामुळे या रस्त्यावर कायम करण्यात येणार होता, परंतु भूसंपादन न झाल्याने काम खोळंबले. या रस्त्यासाठी महापालिकेला केवळ भूसंपादनासाठी ७०० कोटी रुपये खर्च येणार होता. महापालिकेकडे इतके पैसे नसल्याने ८४ ऐवजी ५० मीटर रस्ता करण्याचा निर्णय झाला. जागामालकांना नुकसानभरपाई देण्यासाठी २०० कोटी रुपये लागणार आहेत. ही सर्व तांत्रिक प्रक्रिया होण्यास आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तत्पूर्वी शत्रुघ्न चौकातील इलेक्‍ट्रीक केबल हे दुकान तसेच रस्त्यावरील झाडेही काढण्यात येतील.

कात्रज कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाबाबत पाहणी केली. भूसंपादनासाठी जागा मालक सकारात्मक आहेत. लवकरच हा प्रश्‍न सुटेल. या रस्त्यावर बहुतांश ठिकाणी दुभाजक नसल्याने अपघाताच्या घटना घडू शकतात किंवा वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे दुभाजक टाकण्यात येणार आहेत.
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका