Katraj-Kondhwa Road Tendernama
पुणे

Pune : कात्रज-कोंढवा रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट; दुसऱ्याच दिवशी...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडलेले असताना, अस्तित्वातील रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. पण खड्डे बुजविण्याचे कामही निकृष्ट दर्जाचे केले आहे. महापालिकेने या रस्त्यावर डांबकीरण केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी या ठिकणी खडी निघून गेली असून, खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. य रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी अपघात होत असूनही प्रशासन गंभीर नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्यावर राजस सोसायटी चौकात मोठमोठ खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर स्थानिक वाहतूकीसाठी अवजड वाहनांचीही मोठी वर्दळ आहे. य खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्याच्या अवस्थेकडे प्रशासन दुर्लक्ष केले जात असल्याची टीका स्थानिकांकडून केली जाते. त्यामुळे पथ विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर, अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी या रस्त्याची पाहणी करून त्वरित खड्डे भरून घेण्याचे आदेश दिले होते.

हा रस्ता दुरूस्त करण्यासाठी पथ विभागाने रविवारी रात्री खड्डे बुजविले, पण त्यानंतर अवघ्या काही तासात तेथे पुन्हा खड्डे पडल्याचे दिसून आले आहे. खड्डे बुजविताना चांगल्या दर्जाचे डांबर वापरले नसल्याने हे खड्डे पडले असल्याची शक्यता आहे. ‘‘कात्रज-कोंढवा रस्त्यावर खड्डे बुजविल्यानंतर पुन्हा खड्डे पडल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. याची माहिती घेऊन खड्डे का पडले, डांबराचा दर्जा काय होता याची तपासणी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल,’’ असे पथ विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी सांगितले.